GDS Vacancy 2026: ‘पोस्ट ऑफिस’मध्ये 24 हजारांहून अधिक पदांची ‘मेगाभरती’; परीक्षा, मुलाखत नाही… थेट मेरिटवर निवड
GDS Vacancy 2026: India Post GDS Recruitment 2026 अंतर्गत 24 हजारांहून अधिक पदांसाठी 31 ऑगस्टपासून अर्ज सुरू होणार. 10वी पास उमेदवारांना संधी; निवड मेरिटवर होणार.

GDS Vacancy 2026: इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी GDS Online Engagement Schedule-II July 2026 अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे 24 हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येईल.
10वी पास उमेदवारांना संधी –
या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी (मॅट्रिक) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण गुण मिळवलेले असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय किमान 18 आणि कमाल 40 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत GDS वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर भरतीसंबंधी Registration/Apply लिंकवर क्लिक करून Click Here to Register/Apply आणि त्यानंतर New Candidate Registration हा पर्याय निवडावा. मागितलेली माहिती भरून नोंदणी केल्यानंतर उर्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. लागू असल्यास शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत जतन करावी.
अर्ज शुल्क किती?
सामान्य आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना निःशुल्क अर्ज करता येईल.
परीक्षा, मुलाखत नाही; थेट मेरिटवर निवड
GDS भरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. अधिकृत नियम, पात्रता आणि इतर तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा –
अर्ज प्रक्रिया सुरू : 31 ऑगस्ट 2026
नोंदणीची अंतिम तारीख : 19 सप्टेंबर 2026
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2026
फॉर्म दुरुस्ती : 23 ते 24 सप्टेंबर 2026





