India-Pakistan Tensions : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘फेक न्यूज’ व्हायरल; तक्रारीसाठी सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी

नवी दिल्ली : मागच्या 2 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. यादरम्यान सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत. इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांसंबधीचे बनावट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चुकीचे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत खोटी माहिती पोहोचू नये म्हणून सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत.
सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी
तुम्हाला सोशल मीडियावर एकाखी चुकीची माहिती देणारी बातमी किंवा फोटो, व्हिडीओ आढळून आल्यास याबद्दल आता तक्रार करत येणार आहे. राज्य सरकारकडून अशा ‘फेक न्यूज’बद्दल तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक आणि इमेल आयडी देण्यात आला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात एखादी माहिती शेअर करण्यापूर्वी सामान्य नागरिकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याचीदेखील सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.
चला, #FakeNews विरोधातील लढा एकत्रितपणे जिंकूया!
माहिती जबाबदारीपूर्वक सामायिक करा, राष्ट्रीय सुरक्षेला सहकार्य करा. कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास #PIBFactCheck कडे तक्रार करा
अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क करा
WhatsApp: +91 8799711259
ईमेल: [email protected] pic.twitter.com/fYF7osUbGN— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 9, 2025
दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात काय करावे?
1) केवळ अधिकृत मार्गदर्शक सूचना, मदत क्रमांक संपर्क आणि मदतीविषयीची पडताळून पाहिलेली माहिती सामायिक करा.
2) कोणतीही बातमी सामायिक करण्यापूर्वी त्याची अधिकृत स्त्रोतांद्वारे तथ्य पडताळणी करा.
3) खोट्या बातम्यांविषयी तात्काळ तक्रार करा.
दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात काय करू नये?
1) सैन्य दलांच्या हालचाली विषयीची माहिती सामायिक करू नका.
2) पडताळून पाहिली नसलेली माहिती कोणालाही पुढे पाठवू नका.
3) हिंसा अथवा सामाजिक तणाव निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील अशा पोस्ट टाळा.
‘या’ ठिकाणी करा तक्रार
तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती आढल्यास #PIBFactCheck कडे तक्रार करा, असे अवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला WhatsApp: +91 8799711259, ईमेल: [email protected] या क्रमांकावर किंवा इमेल आयडीवर संपर्क साधा असे आवाहन लोकांना करण्यात आले आहे.





