“पाकचे ड्रोन अन् दारूगोळे वापरून हल्ले, आम्ही सर्व ताकदीने प्रत्युत्तर देऊ” ; भारतीय लष्कराचे निवेदन

India Pakistan Conflict। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर हल्ला केला. मात्र पाकिस्तनाचा हा डाव भारताने उधळून लावला आहे. काल रात्री १५ लष्करी तळांवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर, भारतीय लष्कराने आता एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिल्याचे लष्कराने म्हटले आहे.
भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात, ‘८ आणि ९ मे २०२५ च्या मध्यरात्री पश्चिम सीमेवर पाकिस्तानी सशस्त्र दलांनी ड्रोन आणि इतर दारूगोळ्यांचा वापर करून अनेक हल्ले केले. याशिवाय, जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानने अनेक वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले.” असे म्हटले आहे. India Pakistan Conflict।
OPERATION SINDOOR
Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and… pic.twitter.com/WTdg1ahIZp
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 9, 2025
तसेच पुढे निवेदनात,”भारतीय सैन्याने हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे हाणून पाडले. युद्धबंदी उल्लंघनांना प्रत्युत्तर म्हणून योग्य ती कारवाई केली. भारतीय लष्कर देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. कोणत्याही चुकीच्या कृतीला कडक प्रत्युत्तर दिले जाईल.” असेही म्हटले.
पाकिस्तानने या ठिकाणी ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला India Pakistan Conflict।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री पाकिस्तानने नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (IB) अनेक ठिकाणी एकाच वेळी ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल, भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट सारख्या भागात मोठी कारवाई केली आणि ५० हून अधिक ड्रोन पाडले. या काळात आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला.





