भारत-पाकिस्तान युद्धविराम! अभिनेता सलमान खानच्या पोस्टवर अनेकांनी व्यक्त केला संताप कारण….

Posted by Salman Khan : काल शनिवार १० मे रोजी भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. ३ दिवसांपासून पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारताने योग्य उत्तर दिल्यानंतर भारताने युद्धबंदीला मान्यता दिली. यानंतर अभिनेता सलमान खान केलेल्या पोस्टमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याला भारताने १५ व्या दिवशी पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धाला १० मे राजी युद्धबंदीने पूर्णविराम देण्यात आला.
पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदी यावर बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी आपले विचार व्यक्त करत भारताने केलेल्या कारवाईचे कौतुक केले. सोशल मीडिया वापरकर्त्यांना अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सचे मौन आठवले. त्यापैकी एक सलमान खान देखील आहे. सलमानने दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली, पण ऑपरेशन सिंदूरवर त्याने मौन घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्याने गेल्या तीन दिवसांत एकही पोस्ट केलेली नाही.
Kashmir,heaven on planet earth turning into hell. Innocent people being targeted, my heart goes out to their families . Ek bhi innocent ko marna puri kainath ko marne ke barabar hai
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 23, 2025
१० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. यानंतर सलमान खानने रात्री ९ वाजता त्याच्या एक्स हँडलवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. “युद्धबंदीसाठी देवाचे आभार.” ही पोस्ट प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी त्याने अॅापरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ पोस्ट का केली नाही असा सवाल केला आहे. सलमान व्यतिरिक्त शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या मौनानेही लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तर काही लोक सलमान खानच्या बाजूनेही आपली प्रतिक्रिया देत आहेत.





