पाकिस्तानच्या मुद्द्यावरून शशी थरूरांचा ट्रम्प यांना इशारा ; म्हणाले,”आम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही…”

India Pakistan ceasefire। ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक वेळा युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. अमेरिकेमुळेच युद्धबंदीवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. या मुद्द्यावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी “आम्हाला (भारताला) कोणीही ते समजावून सांगण्याची गरज नाही” असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ ब्राझीलला पोहोचले. थरूर यांनी ब्राझीलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांची भेट घेतली. यावेळी, उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांनी भारतीय शिष्टमंडळाच्या ब्राझील भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना थरूर म्हणाले, “आम्हाला कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आम्ही ते आधीच थांबवले होते. जर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणाला पटवून द्यायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला असता. आम्हाला युद्ध नको असल्याने आम्हाला पटवून देण्याची गरज नाही.” असे थरूर यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर ट्रम्प यांच्याकडून अनेक वेळा विधाने India Pakistan ceasefire।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेण्यास कधीही थकत नाहीत. अमेरिकेमुळेच दोन्ही देशांमधील युद्ध टळले, असा दावा त्यांनी अनेकदा केला आहे. ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच म्हटले होते की त्यांनी युद्धबंदीसाठी व्यापार कराराचा अवलंब केला आहे.
दहशतवादी पाठवणाऱ्यांशी कसे बोलावे India Pakistan ceasefire।
ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो यांची भेट घेतल्यानंतर शशी थरूर म्हणाले, “दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्हाला एकता हवी आहे. या देशांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की त्यांना काही मुद्दे समजतात, परंतु काही पूर्णपणे समजलेले नाहीत. अनेक देश स्वाभाविकपणे संवाद साधण्याचा सल्ला देतात, परंतु जे तुमच्या डोक्यावर बंदूक रोखून दहशतवाद्यांना तुमच्या सीमेवर पाठवत आहेत त्यांच्याशी बोलणे खूप कठीण आहे. ही एक मूलभूत समस्या आहे. पहिले पाऊल म्हणजे त्यांनी दहशतवादाची पायाभूत सुविधा नष्ट करावी.”





