‘पाकिस्तान हा दहशतवादाचा कारखाना, त्यांच्या पंतप्रधानांचे भाषण केवळ विनोद’ ; भारताने UNGA मध्ये पाकला सुनावले खडेबोल

India-Pakistan । पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावर भारताने आता पाकला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय मुत्सद्दी भाविका मंगलानंदन यांनी UNGA मध्ये उत्तर देण्याच्या अधिकारादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणाला एक ‘विनोद’ म्हणून संबोधले. तसेच पाकिस्तानला दहशतवादाची फॅक्टरी म्हटले.
पाकिस्तानी पंतप्रधानांना प्रत्युत्तर देताना भाविका मंगलानंदन यांनी, “जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा वापर केला आहे.” असा आरोप यावेळी त्यांनी केला. पुढे भाविका मंगलानंदन म्हणाल्या की, “पाकिस्तानने जगात कुठेही हिंसाचाराच्या विरोधात बोलणे हा दांभिकपणा आहे.”
‘पाकिस्तानी पंतप्रधानांचे भाषण विनोदी’ India-Pakistan ।
भारतीय मुत्सद्दी भाविका मंगलानंदन यांनी यावेळी,”आज सकाळी या विधानसभेत (यूएन) एक हास्यास्पद घटना घडली ही खेदाची बाब आहे. मी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणातील भारताच्या संदर्भाबाबत बोलत आहे. जगाला माहीत आहे की, पाकिस्तान त्याने आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध सीमापार दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर केला आहे, आपल्या संसदेवर, आपली आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला आहे, ही यादी पुढे आहे.
कुठेही हिंसाचारावर बोलणे हा पाकिस्तानचा सर्वात मोठा ढोंगीपणा असल्याचे भारतीय राजनयिक भाविका मंगलानंदन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “दहशतवाद, अंमली पदार्थ, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी जगात कुप्रसिद्ध असलेला लष्करी देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस करतो.”
पाकिस्तानकडून छेडछाड करून बिनबुडाचे आरोप India-Pakistan ।
भारताच्या उत्तराच्या अधिकारानंतर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी भारतावर बिनबुडाचे आरोप केले. ते म्हणाले की, भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. “आरएसएस-भाजप सरकार दलित, अल्पसंख्याक आणि काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे. तेहरीक-ए-पाकिस्तान आणि बलुचिस्तान आर्मीच्या वतीने भारत पाकिस्तानमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे,” असा आरोप पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी केला आहे.
हेही वाचा
‘पंजाबचे काही लोक शेतकऱ्यांचा मुखवटा धारण करून …’ ; मनोहर लाल खट्टर यांच्या वक्तव्यावरून राजकीय खळबळ





