India-Canada dispute : भारताकडून कॅनडाच्या 41 अधिकाऱ्यांना देश सोडण्याचा अल्टिमेटम; अमेरिकेने प्रतिक्रिया देत म्हटले,”हे राजनैतिक संकट”

India-Canada dispute : भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. कारण भारताने कॅनडाला अल्टिमेटम देत आपल्या 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत मायदेशी बोलावण्यास सांगितले आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत या अधिकाऱ्यांना मुदत देण्यात अली आहे. तर यानंतर हे अधिकारी भारतात राहिले तर त्यांचे सर्व राजनैतिक इम्युनिटी काढून घेतल्या जातील असा इशारा भारताने कॅनडाला दिला आहे. दरम्यान,भारताच्या या अल्टिमेटमवर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी भारताच्या या अल्टिमेटमवर म्हणाले, “भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक वादाची त्यांना जाणीव आहे. भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयाकडून त्यांना ही माहिती मिळाली आहे. मला कोणत्याही गृहीतकांमध्ये पडायचे नाही. हे एक राजनैतिक संकट असून अमेरिका, भारत आणि कॅनडावर सोडायचे आहे,”असे म्हटले.
मात्र, कॅनडाने भारतावर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आम्ही कॅनडाच्या संपर्कात आहोत. भारत सरकारने कॅनडाच्या तपासात सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून गुन्हेगारांना न्याय मिळवून देता येईल.” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना वेदांत पटेल यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातली वादामुळे इंडो-पॅसिफिक धोरणाविषयीच्या मुद्द्यावर बोलताना,”,मी भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांबाबतचे अहवाल पाहिले आहेत. परंतु त्या अहवालांना प्रतिसाद देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. मला कोणत्याही गृहीतकात नक्कीच पडायचे नाही. मला या संपूर्ण प्रक्रियेची पूर्ण माहिती आहे. “मला एका वेळी एक पाऊल टाकायचे आहे.
“ही बाब इंडो-पॅसिफिक रणनीतीशीही संबंधित असल्याने आम्ही या प्रदेशावर लक्ष केंद्रित करत आहोत. अशा परिस्थितीत आम्ही निश्चितपणे या प्रदेशात भारतासोबत काम करत राहू. क्वाड व्यतिरिक्त, आम्ही भारताला अनेक क्षेत्रात पाठिंबा देऊ. असे त्यांनी म्हटले. तसेच “आम्ही भारताचे भागीदार देश आहोत. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, आम्ही कॅनडाने केलेले आरोप अतिशय गांभीर्याने घेतो. आम्ही सार्वजनिक आणि खाजगीरित्या भारत सरकारला कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे.”असे म्हणत त्यांनी कॅनडाच्या आरोपांना पाठिंबाच दिला असल्याचे दिसत आहे.





