WTC Points Table (2023-2025) : पाकिस्तानच्या पराभवाचा Team India ला झाला असा फायदा…

World Test Championship 2023-24 : ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. वास्तविक, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. याआधी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पाकिस्तान अव्वल स्थानावर होता. भारत आणि पाकिस्तानच्या गुणांची टक्केवारी बरोबरी असली तरी, टीम इंडियाने आतापर्यंत एकही कसोटी सामना नाही, त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीपूर्वी पाकिस्तानची गुणांची टक्केवारी 100 होती, मात्र आता पराभवानंतर गुणांची टक्केवारी 66.67 वर आली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आहेत, तर 1 कसोटीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानचे 2 विजय आणि 1 पराभवासह 24 गुण आहेत. त्याच वेळी, टीम इंडियाने आत्तापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत, दोन्ही कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेल्या होत्या. त्यापैकी 1 मध्ये विजय, तर 1 कसोटी अनिर्णीत राहिली होती. म्हणजेच टीम इंडिया अद्याप हरलेली नाही. अशा प्रकारे भारताचे 16 गुण आणि गुणांची टक्केवारी 66.67 आहे.
इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंड 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड संघाची गुणांची टक्केवारी 50 आहे. त्याचवेळी बांगलादेशचा (12 गुण) संघ समान गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची 41.67 गुणांची टक्केवारी आहे आणि हा संघ 30 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय वेस्ट इंडिज 4 गुण आणि 16.67 गुणांच्या टक्केवारीसह सहाव्या स्थानावर कायम आहे.
India are now the Table Toppers of WTC Points Table…!!! pic.twitter.com/wr6nDV1LOo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 17, 2023
दरम्यान, आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने इतर संघांपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत, कांगारूंनी 6 कसोटी सामने खेळले आहेत, 3 जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत, 1 कसोटी अनिर्णीत राहिली आहे.






