INDIA Bloc Protest: राहुल-प्रियांका गांधींचा आकाशवाणी भवनात ठिय्या ; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
INDIA Bloc Protest: इंडिया ब्लॉकच्या १४० हून अधिक खासदारांनी एसआयआर (SIR) आणि निवडणूक आयोगाविरोधात संसदेपासून आयोगाच्या रस्त्यापर्यंत मोर्चा काढला आहे.

INDIA Bloc Protest: इंडिया ब्लॉकच्या १४० हून अधिक खासदारांनी एसआयआर (SIR) आणि निवडणूक आयोगाविरोधात संसदेपासून आयोगाच्या रस्त्यापर्यंत मोर्चा काढला आहे.
इंडिया ब्लॉकचे खासदार संसद भवनातून निवडणूक भवनाकडे जात आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओ’ब्रायन यांच्यासह इंडिया ब्लॉकच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आकाशवाणी भवनात प्रवेश करताना राहुल गांधींना रोखण्यात आले. ते आकाशवाणी भवनमार्गे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आले. त्यामुळे प्रियांका आणि राहुल गांधी या दोघांनी कार्यकर्त्यांसह त्याचठिकाणी ठिय्या मांडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांनी निवडणूक आयोगापासून सुमारे २०० मीटर अंतरावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसचे अनेक कार्यकर्तेही आकाशवाणी भवनच्या प्रवेशद्वाराबाहेर पोहोचले आहेत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यावेळी, ३०० हून अधिक विरोधी खासदारांना निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी आज संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढायचा आहे.त्यासोबतच हे खासदार लाखो भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात, तरीही निवडणूक आयुक्त त्यांना का भेटत नाहीत.? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. राहुल गांधी यांनीही पोलीस आपल्याला का थांबवत आहेत आणि धमक्या का देत आहेत, असा प्रश्न यावेळी विचारला.
More than 300 Opposition MPs marched from Parliament to the Election Commission today to meet the Election Commissioners.
We represent crores of Indians.
– Why aren’t the Election Commissioners meeting us?
– Why is the police stopping and threatening us? https://t.co/tlIck8WoZX— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2026
आकाशवाणी भवनजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसून आला. वास्तविक, दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवनच्या मागील गेटकडे जाणाऱ्या गल्लीत बॅरिकेड्स लावून निर्वचन सदनकडे जाणारा मार्ग अडवला होता. मागील गेटवरील बॅरिकेड्सवर आणि पुढील गल्लीत पोलीस तैनात करण्यात आले होते.
अखिलेश यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला. अखिलेश यादव म्हणाले की, भाजपने बंगालमध्ये फसवणूक करून विजय मिळवला आहे.
मोर्चाच्या शक्यतेने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अनेक विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनी निर्वचन सदनजवळ बॅरिकेड्स लावून इंडिया ब्लॉकच्या नेत्यांना थांबवले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांनी तेथे धरणे आंदोलन केले.
राहुल गांधी यांनी पोलिसांचा बॅरिकेड चढून राष्ट्रध्वज फडकवला. भाजप अस्वस्थ आहे, असे सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले. त्यांनी भाजपवर पोटनिवडणुकांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोपही केला आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार झिया-उर-रहमान बर्क यांनी आपल्या सहकारी खासदारांसह निवडणूक आयोगाकडे जाताना नीती आयोगाच्या कार्यालयाजवळील पोलिसांचा बॅरिकेड चढला.
दरम्यान, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, डी. राजा आणि इंडिया ब्लॉकच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी आकाशवाणी भवनाबाहेर धरणे आंदोलन केले आहे. वृत्तानुसार, पहिला बॅरिकेड संसदेपासून सुमारे ४०० मीटर अंतरावर होता. घटनास्थळी बसेस आणि निमलष्करी दलही दाखल झाले आहे. मात्र, अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.


