New Zealand Defeats : डकवर्थ-लुईसने सामना फिरवला अन् किवींचे कंबरडे मोडले! एकाच वर्षात भारताने ११ वेळा चारली धूळ
New Zealand Defeats : पावसामुळे बाधित झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने न्यूझीलंडचा ४ धावांनी पराभव करून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. गुरनूर ब्रारने ३० धावांत चार विकेट्स घेतले.

India Beat New Zealand 2nd ODI Record 11th Defeat In Single Calendar Year : न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार न्यूझीलंडचा ४ धावांनी पराभव केला. या रोमहर्षक विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी मिळवली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला या पराभवामुळे न्यूझीलंडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका अतिशय लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
एका वर्षात ११ वा पराभव; मोडला २००५ मधील जुना रेकॉर्ड
वर्ष २०२६ हे न्यूझीलंडसाठी भारताविरुद्ध अत्यंत निराशाजनक ठरले आहे. या वर्षात न्यूझीलंडला भारताकडून पत्करावा लागलेला हा तब्बल ११ वा पराभव आहे. एकाच कॅलेंडर वर्षात एखाद्या विशिष्ट प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने गमावण्याचा नकोसा विक्रम आता किवींच्या माथी लागला आहे. यापूर्वी २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडने एकाच वर्षात १० सामने गमावले होते, तर २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांना ९ पराभव पत्करावे लागले होते; आता भारताने तो जुना विक्रम मोडला आहे.
गुरनूर ब्रारची भेदक गोलंदाजी; न्यूझीलंड १३४ धावांवर गारद
India prevail over New Zealand in a thrilling encounter in Wellington to go 2-0 up in the ODI series 🙌
📝: https://t.co/VW3l4wB6cm https://t.co/8ViW0jHxQ5
— ICC (@ICC) November 7, 2026
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडला वेलिंग्टनच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि भेदक माऱ्यासमोर किवींची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. संपूर्ण न्यूझीलंड संघ ४१ षटकांत अवघ्या १३४ धावांवर गारद झाला. भारताकडून युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने सर्वाधिक कहर करत १० षटकांत अवघ्या ३० धावांच्या मोबदल्यात ४ महत्त्वाचे विकेट्स घेतल्या.
डॅरिल मिचेलची एकाकी झुंज; भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व
🚨 NEWZELAND LOWEST EVER TOTAL🚨
New Zealand was bowled out for 134, recording their lowest-ever all-out total at home against India in ODI cricket
#INDvsNZ #2ndODI https://t.co/EBHIQUutoA
— VEER SA (@veersaa007) November 7, 2026
न्यूझीलंडकडून केवळ डॅरिल मिचेलने भारतीय माऱ्याचा संयमाने प्रतिकार केला. त्याने १०४ चेंडूंचा सामना करताना ५५ धावांची झुंजार अर्धशतकीय खेळी साकारली. मात्र, इतर कोणत्याही फलंदाजाला त्याला साथ देता आली नाही. भारताकडून गुरनूर ब्रारव्यतिरिक्त अंशुल कंबोज, आकिब नबी आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ फलंदाजांना तंबूत धाडत न्यूझीलंडला स्वस्तात गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
पावसाचा व्यत्यय अन् डकवर्थ-लुईसने भारताला जिंकवले –
विजयासाठी मिळालेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने २६ षटकांत ७ विकेट्सच्या नुकसानावर ११३ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी ६६ चेंडूंत २२ धावांची गरज असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. अखेर खेळ पुन्हा सुरू न होऊ शकल्याने पंचांनी डकवर्थ-लुईस पार स्कोअरच्या आधारे भारताला ४ धावांनी विजयी घोषित केले. या निसटत्या विजयासह भारताने मालिका विजयाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.





