‘Appreciate US Efforts’ ! ; अमेरिकेने TRF ला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर भारताची प्रतिक्रिया

India Appreciate US । अमेरिकेने द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केली आहे. त्यानंतर भारताकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमेरिकेचे कौतुक करत,”या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहेत हे सिद्ध झाले आहे.” असे म्हटले. तसेच जयशंकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचेही कौतुक केले आहे.
एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये, “भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहेत हे स्पष्ट झाले आहे. मार्को रुबियो आणि अमेरिकेचे आभार, ज्यांनी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची प्रतिनिधी संघटना टीआरएफला परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) आणि स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट (एसडीजीटी) घोषित केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी त्यांनी घेतली. “टीआरएफने अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत.” असे म्हटले आहे. India Appreciate US ।
A strong affirmation of India-US counter-terrorism cooperation.
Appreciate @SecRubio and @StateDept for designating TRF—a Lashkar-e-Tayyiba (LeT) proxy—as a Foreign Terrorist Organization (FTO) and Specially Designated Global Terrorist (SDGT). It claimed responsibility for the…
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 18, 2025
टीआरएफ ही पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी आहे, ज्याने आतापर्यंत अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. टीआरएफने पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारीही घेतली होती. यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. अमेरिकेने आता टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. पाकिस्तान दररोज भारताविरुद्ध कट रचत राहतो. टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढतील.
मार्को रुबियो यांनी टीआरएफबद्दल काय म्हटले? India Appreciate US ।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभी असल्याचे सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी आता एक निवेदन जारी केले आहे की टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की आमचा निर्णय दहशतवादाविरुद्ध अमेरिकेच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.





