INDIA Alliance : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘जनमहाभियोग’; राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते आक्रमक
INDIA Alliance : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने जनमहाभियोग कार्यक्रम आयोजित केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी सहा आरोपांचे पत्र सादर केले. राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.

INDIA Alliance : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने शनिवारी (३१ ऑक्टोबर) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला राहुल गांधी, ममता बॅनर्जी, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते.
ज्ञानेश कुमार ने Election Commission के साथ-साथ भारत की साख पर बट्टा लगाया है। इस देश को तोड़ने की साजिश की है।
इसलिए मैं इस देश के तमाम जनसंगठनों और जनआंदोलनों की तरफ से CEC ज्ञानेश कुमार के खिलाफ जन-महाभियोग का पूर्ण समर्थन करता हूं।
: स्वराज इंडिया के अध्यक्ष @_YogendraYadav जी
📍 दिल्ली
— Congress (@INCIndia) October 31, 2026
कार्यक्रमात खरगे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. मतदार याद्यांमधील विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेतून पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करावे आणि सामान्य नागरिकांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
LIVE: The Public Impeachment of CEC Gyanesh Kumar, 10 Rajaji Marg, New Delhi https://t.co/qjQrxdYmtr
— Congress (@INCIndia) October 31, 2026
खरगे यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सहा प्रमुख आरोपांचे पत्र सादर केले. त्यात मतदार याद्यांमधील बदल, निवडणूक प्रक्रियेतील कथित हस्तक्षेप आणि आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. या आरोपांची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि त्यांना मिळालेले कायदेशीर संरक्षण रद्द करावे, अशी मागणीही करण्यात आली.
🔹Gyanesh Kumar deleted crores of voters. I myself had to undergo two hearings to establish that I am an eligible voter in this country. If this is the plight of an MP, one can only imagine the predicament of an ordinary citizen.
🔹There is a pattern in every action of the Modi government to narrow the democratic space, concentrate power, and prepare the ground for permanent control.
: CPI (M) MP @JohnBrittas ji at the Public Impeachment of CEC Gyanesh Kumar
— Congress (@INCIndia) October 31, 2026
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांना पदावर कायम राहता येणार नाही, अशी भूमिका मांडली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली. समाजवादी पक्षाचे नेते हरेंद्र मलिक यांनी SIR प्रक्रियेचा परिणाम वंचित घटकांतील मतदारांवर होत असल्याचा आरोप केला.
मैं अपनी पार्टी और संसदीय दल की तरफ से ज्ञानेश कुमार के खिलाफ लाए जा रहे जन-महाभियोग का समर्थन करता हूं।
हम चाहते हैं कि CEC ज्ञानेश कुमार को पद से हटाया जाए, गिरफ्तार कर जेल भेजा जाए और उनके ऊपर देशद्रोह का मुकदमा चले।
: CEC ज्ञानेश कुमार के खिलाफ जन-महाभियोग में CPI(ML) Liberation के सांसद सुदामा प्रसाद जी
📍 दिल्ली
— Congress (@INCIndia) October 31, 2026
दरम्यान, खासदार जॉन ब्रिटास यांनी मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.





