India A Victory : तिलक-कुशाग्रच्या शतकानंतर प्रिंस-हर्षितचा कहर! आशिया चषकात भारताने नेपाळवर ३०६ धावांनी नोंदवला ऐतिहासिक विजय
India A Victory : रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ च्या पहिल्या सामन्यात भारत 'अ' संघाने नेपाळला ३०६ धावांनी पराभूत करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

India A registers a historic 306-run victory over Nepal : रायझिंग स्टार्स आशिया चषक २०२६ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात इंडिया-ए संघाने नेपाळचा ३०६ धावांच्या विशाल फरकाने धुव्वा उडवत स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे. या एकतर्फी आणि ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्यावरच उलटला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद ३३२ धावांचा डोंगर उभारला. यानंतर प्रत्युत्तरात नेपाळचा संपूर्ण डाव अवघ्या २६ धावांत गुंडाळत ऐतिहासिक विजय नोंदवला.
४२/३ च्या संकटातून तिलक-कुशाग्रने सावरले –
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती आणि अवघ्या ४२ धावांत तीन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि आयुष बडोनी स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघ दडपणाखाली होता. मात्र, कर्णधार तिलक वर्मा आणि यष्टीरक्षक कुमार कुशाग्र यांनी चौथ्या विकेटसाठी २०६ धावांची विक्रमी भागीदारी रचत सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले आणि संघाला संकटातून बाहेर काढले.
शतकी खेळींसह सूर्यांश शेडगेची स्फोटक फटकेबाजी –
India A’s largest victory (by runs) in List A cricket ✅
An exceptional performance from India A to register a mammoth 3️⃣0️⃣6️⃣-run victory over Nepal to kickstart their #RisingStarsAsiaCup campaign 🥳🥳
Scorecard ▶️ https://t.co/r7KnQLPzIm
#TeamIndia | #INDAvNEP https://t.co/RMzAlrrHDG
— BCCI (@BCCI) November 20, 2026
या सामन्यात कुमार कुशाग्रने १०२ चेंडूत ११७ धावांची शानदार शतकी खेळी केली, तर कर्णधार तिलक वर्माने ११३ चेंडूत १०७ धावांचे मोलाचे योगदान दिले. डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये युवा अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेने अवघ्या १४ चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी करत संघाला जबरदस्त फिनिशिंग टच दिला. या तिघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंडिया-ए संघाने ३३२ धावांपर्यंत मजल मारली.
१ धावेवर ४ विकेट्स गमावत नेपाळचा डाव कोसळला –
Soaked in the pressure 😇
Delivered a match-winning knock 👊Kumar Kushagra’s stunning Player of the Match performance 🌟
Scorecard ▶️ https://t.co/r7KnQLPzIm
#TeamIndia | #INDAvNEP | #RisingStarsAsiaCup https://t.co/8Or9sVt2T4
— BCCI (@BCCI) November 20, 2026
प्रत्युत्तरात ३३३ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेपाळची सुरुवात एखाद्या वाईट स्वप्नासारखी झाली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळी फलंदाज पूर्णपणे हतबल झाले आणि संघाने अवघ्या १ धावेवर आपले पहिले ४ गडी गमावले. या सुरुवातीच्या धक्क्यातून नेपाळचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही आणि नियमित अंतराने विकेट्स गमावत संपूर्ण संघ अवघ्या २६ धावांवर गारद झाला.
हर्षित राणा आणि प्रिंस यादव यांच्या गोलंदाजीचा कहर –
Terrific start with the ball 👌
Harshit Rana 🤝 Prince Yadav
4️⃣ wickets in no time for India A
Updates ▶️ https://t.co/r7KnQLPzIm
#TeamIndia | #INDAvNEP | #RisingStarsAsiaCup https://t.co/xElAbC0CPb
— BCCI (@BCCI) November 20, 2026
दुसऱ्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि प्रिंस यादव यांचा एकतर्फी दबदबा पाहायला मिळाला. सामना लवकरात लवकर संपवून हॉटेलवर परतण्याच्या इराद्यानेच जणू हे दोन्ही गोलंदाज मैदानात उतरले होते. एका बाजूने हर्षित आणि दुसऱ्या बाजूने प्रिंस यांच्यात जणू विकेट्स घेण्याची स्पर्धाच लागली होती. या दोघांच्या धारदार गोलंदाजीपुढे नेपाळच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि भारताने ३०६ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.





