“राष्ट्रवादी’साठी इंदापूरची जनता केंद्रबिंदू

रेडा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देशाच्या सत्तेत नसताना देखील इंदापूरची गरीब जनता केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी विकासनिधी खेचून आणत आहे. बावडा-लाखेवाडी (ता. इंदापूर) या जिल्हा परिषद गटातील रस्त्यांची अवस्था वाईट झालेली होती. शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांना सतत अपघाताला सामोरे जावे लागत होते. या भागातून रस्ते विकासाची मागणी होत होती, त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी 13 कोटी 57 लाखांचा निधी प्राधान्याने मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान संरक्षक भिंत 7 लाख, रामोशी समाज मंदिर सामाजिक सभागृह 10 लाख या आमदार फंडातील कामाचे, तसेच लुमेवाडी गिरवी पिंपरी रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी 60 लाख, गिरवी आडोबा वस्ती रस्ता सुधारणा करणे 1कोटी 80 लाख आणि नरसिंहपूर येथील जामदार वस्ती, निंबाळकर वस्ती, काळे वस्ती, रस्ता सुधारणा करणे 6 कोटी आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले, यावेळी आमदार भरणे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, बाळासाहेब ढवळे, हनुमंत कोकाटे, दत्तात्रय घोगरे, नवनाथ रुपनवर, हामा पाटील, माजी सरपंच उस्मान शेख, विजय घोगरे, तुकाराम घोगरे, अजित टिळेकर, जिग्नेश कांबळे, नाना कांबळे, सुनील जगताप, शब्बीर काझी, दादा पाटील, पोपट कोरे, नरसिंहपूरच्या सरपंच कांचन डिंगरे, अरुण क्षीरसागर, गौरव दंडवते आदी मान्यवर उपस्थित होते.

उर्वरित कामेही लवकरच होणार
इंदापूर तालुक्‍यातील सर्व गावात आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून कोट्यवधी रकमेचा निधी मंजूर केल्याने विकासकामे दमदार सुरू आहेत, तर उर्वरित विकासकामासाठी मोठा निधी मंजूर झाला असल्याने इतिहासात पहिल्यांदाच इंदापूर तालुक्‍यात विकासकामाचा धडाका सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख हमा पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)