Indapur News : ‘त्या’ कॉन्ट्रॅक्टरला गाळे धारकांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्या

इंदापूर : इंदापूर शहरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलातील नगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीने अनेक गाळे धारकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे,नादुरुस्त झाले आहेत. तसेच काही उपकरणे जळाली आहेत. या गाळेधारकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आदेश द्या अशा आशयाचे लेखी निवेदन इंदापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रमेश ढगे यांना बुधवार (ता.१९ रोजी) इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
या दिलेल्या निवेदनात नागरिक संघर्ष समितीने म्हटले आहे की,इंदापूर नगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलातील दुकान गाळ्यांचे कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हि सदरचे दुकाने बेरोजगार तरुणांची असून, कर्ज काढून मोठ्या प्रमाणात डिपॉझिट भरून,व्यवसाय उभे केले आहेत अश्या परिस्थितीत नगरपालिका मोठ्या प्रमाणात भाड्याने डिपॉझिट घेते.परंतु संरक्षण देताना दिसत नाही.
पावसाळ्यामध्ये सदर गाळे गळल्यामुळे पूर्वीच लाखो रुपयाचे या तरुणांचे नुकसान झाले आहे.तरी सदर विषयात तातडीने लक्ष घालून,संबंधित कॉन्ट्रॅक्टरला नुकसान भरपाई देण्यासंबंधी सूचना कराव्यात अन्यथा(ता. २७ मार्च)रोजी व इंदापूरकर नागरिक, गाळेधारक संघटना यांच्या वतीने नगरपालिकेवरती भव्य असा मोर्चा काढला जाईल असाही इशारा नागरी संघर्ष समितीने दिला आहे.
हे निवेदन दिल्यावर तात्काळ संबंधित ठेकेदार यांचे मॅनेजर यांनी जे गाळेधारकांचे नुकसान झाले आहे.त्याची भरपाई देण्यात येईल असे गाळे धारकांच्या समोर येऊन सांगितले. यावेळी कृष्णा ताटे,विठ्ठल ननवरे,हमीदभाई आतार,महादेव चव्हाण,संतोष जामदार,अशोक ननवरे,रघुनाथजी खरवडे,दादासाहेब देवकर, सूर्यकांत गुंड उपस्थित होते.





