Indapur News : इंदापूरात पर्यावरण दिन उत्साहात साजरा; नवदांपत्याने वृक्षारोपण करत दिला अनोखा संदेश

इंदापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इंदापूर शहरात वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायरा अत्तार यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन रॅली काढली आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला. यावेळी नवविवाहित जोडपे यतीन गांधले आणि मीनल यांनी आपल्या लग्नाच्या मुहूर्तापूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी स्थळावर वृक्षारोपण करत पर्यावरण संरक्षणाचा अनोखा संदेश दिला.
इंदापूर नगरपालिकेसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पर्यावरण जोपासण्याच्या घोषणांसह रॅली काढण्यात आली. याच दिवशी यतीन गांधले आणि कोकण कन्या मीनल यांचा शुभविवाह दुपारी १:४५ वाजता होणार होता. पुरोगामी विचारसरणीच्या गांधले कुटुंबाने प्रथम वृक्षारोपण आणि नंतर विवाहाचा निर्णय घेतला. त्यानुसार, नवदांपत्याने पालखीतळावर येऊन वृक्षारोपण केले.
या उपक्रमात इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अलकाताई ताटे, सायरा अत्तार, डॉ. कल्पना खाडे, पी.आय. खंडागळे, कॉन्स्टेबल माधुरी लडकत, डॉ. प्रतिभा वणवे, नगर परिषदेच्या रश्मी बारस्कर, लता नायकुडे, रोहिणी शिंदे, वर्षा शिंदे, रश्मी निलाखे, माधुरी मंदरे, माधवी सोननीस, जाधव मॅडम, रेश्मा शेख, कार्यालयीन अधीक्षक स्वप्नील हाके, दत्तात्रय गुजर, इंदापूर शहर संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे, प्रा. अरविंद गारटकर, संदिपान कडवळे, धरमचंद लोढा, चंद्रकांत देवकर, प्रशांत सिताप, अशोक चिंचकर, हरीदास सामसे, महादेव चव्हाण, हमीद अत्तार, जयवंत नायकुडे, भारत बोराटे, हाजी सलीमभाई बागवान, ॲड. आनंद केकान, कुशाल कोकाटे, सागर कांबळे, गांध भगिनी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाने इंदापूरकरांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, नवदांपत्याच्या अनोख्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





