Indapur News : कौठळीतील गावकऱ्यांना कृषीमंत्र्यांचा शब्द! दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

इंदापूर : कौठाळी गाव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे निर्माण झाले असून, या गावाच्या सर्व भागांचा वेगाने विकास कामांसाठी मुबलक निधी देऊन या परिसराचा विकास केला जाईल, असा शब्द राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.
राज्याचे कृषीमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थित पुणे येथे कौठळी गावचे ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ जाधव, सोसायटी सदस्य दत्तात्रय भंडलकर, ग्रामपंचायत सदस्य अंकुश भंडलकर, भोजलिंग माने, युवा नेते नाना भंडलकर, पिनू बोडरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
इंदापूर तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होत असून, गावागावातील युवक शेतकरी तसेच सर्व घटकातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराकडे आकर्षित होत आहेत. आतापर्यंत कोणत्याही गावाला विकास कामाच्या बाबतीत कुठेही आम्ही दुजा भाऊ दिलेला नाही. आता तरी या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्यामुळे मागील तेवढा निधी पुरवू गावकऱ्यांनी चिंता करू नका, असा सल्ला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.
यावेळी पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतापराव पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, युवा नेते शिवाजी तरंगे, पुणे जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष हामा पाटील, युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ सुभाष डरंगे उपस्थित होते.





