IND W AUS W : स्मृतीने विचित्र पद्धतीने गमावली विकेट! थर्ड अंपायरच्या निर्णयाने झाली चकित, पाहा VIDEO

Smriti Mandhana Bizarre Dismissal Video viral : महिला वनडे विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३३९ धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले आहे. हे आव्हान पार करण्यासाठी भारतीय संघाला मजबूत सुरुवात हवी होती, पण अपेक्षेनुसार सुरुवात मिळाली नाही. उपांत्य फेरीसारख्या दबावाच्या सामन्यात सलामीवीर स्मृती मंधानाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ती मोठी खेळी खेळू शकली नाही आणि विचित्र पद्धतीने बाद झाली. ज्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
१०व्या षटकात मंधाना झाली बाद –
सलामीवीर शफाली वर्मा लवकर बाद झाल्यानंतर स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारतीय डाव सावरला. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत होते आणि मोठी खेळी खेळतील असे वाटत होते. मात्र, १०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अनपेक्षित घडले. ऑस्ट्रेलियाच्या किम गर्थ हे षटक टाकत होती. या चेंडूवर मंधाना बाद होऊन माघारी परतली.
मंधानाने कशी गमावली विकेट?
🚨The ball that dismissed Smriti Mandhana was clocked at 159.6 kmph — absolutely unplayable delivery 🔥#INDvAUS pic.twitter.com/SB3q6osKQM
— ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) October 30, 2025
किम गर्थचा हा चेंडू लेग साइडकडे जात होता. मंधानाने लेग साइडला फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट यष्टिरक्षक एलिसा हिलीच्या हातात गेला. ऑस्ट्रेलियाने झेलबादच्या अपीलचा जोरदार दावा केला, मात्र मैदानी पंचाने नकार दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये दिसले की, चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून यष्टिरक्षकाकडे गेला होता. रिव्ह्यू पाहताना मंधाना पंचांना सांगत होती की, चेंडू बॅटला लागला नाही. पण रिव्ह्यूनंतर पंचाने तिला बाद घोषित केले. पंचांच्या निर्णयाने मंधाना निराश होऊन पव्हेलियनमध्ये परतली.
हेही वाचा – IND A vs SA A : भारतीय फिरकीपटूंची पहिल्याच दिवशी कमाल! दक्षिण आफ्रिकेने गमावल्या ९ विकेट्स
मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत १००० धावा केल्या पूर्ण –
स्मृती मंधाना या सामन्यात २४ चेंडूत २४ धावा करून बाद झाली. याच खेळीत तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत १००० धावा पूर्ण केल्या आणि असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. यापूर्वी हा विक्रम मिताली राजने केला होता. मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ११२३ धावा केल्या आहेत. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या ३३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.





