Phoebe Litchfield Record Breaking century : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे विश्वचष्टकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फोबी लिचफील्डने दमदार फलंदाजी करत शतक ठोकले. तिने अवघ्या ७७ चेंडूंमध्ये शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. फोबी लिचफील्डच्या नावावर झाले हे विक्रम – फोबी लिचफील्डने हे शतक २२ वर्षे आणि १९५ दिवसांच्या वयात ठोकले. यासह ती विश्वचष्टकाच्या नॉकआऊट सामन्यात शतक ठोकणारी सर्वात तरुण महिला फलंदाज ठरली. तसेच, विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही तिच्या नावे झाला. या सामन्यात ती ९३ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११९ धावा करून बाद झाली. तिचा स्ट्राइक रेट १२७.९६ होता. या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे. फोबी लिचफील्ड आणि एलिसा पेरी यांच्यात शतकी भागीदारी या उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. कर्णधार अॅलिसा हीली लवकर बाद झाल्यानंतर फोबी लिचफील्ड आणि एलिसा पेरी यांच्या भागीदारीने संघाला जोरदार पुनरागमन करून दिले. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. याशिवाय, एलिसा पेरीनेही अर्धशतक ठोकले असून, ती या खेळी मोठ्या खेळीत रूपांतरित करू इच्छिते. हेही वाचा – Rohit Sharma : रोहित केकेआरमध्ये जाणार? अभिषेक नायर KKR चा कोच झाल्यानंतर MI ची क्रिप्टिक ‘ती’ पोस्ट चर्चेत दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल – या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले, तर भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले. आता प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया भारतासमोर किती मोठा लक्ष्य ठेवते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.