Gill DRS Controversy : वेलिंग्टन कसोटीत तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद! फिलिप्सच्या पायचीत रिव्ह्यूवर कर्णधार गिल पंचावर संतापला
Gill DRS Controversy : भारत आणि न्यूझीलंड यांच्याती पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने ५ बाद २४३ धावांचा डोंगर उभारला आहे. ग्लेन फिलिप्स (९४) आणि हेन्री निकोल्स (११३) नाबाद आहेत.

IND vs NZ 1st Test Shubman Gill DRS Controversy Glenn Phillips LBW : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ग्लेन फिलिप्सच्या विकेटसाठी घेतलेल्या रिव्ह्यूवरून मैदानात मोठा वाद पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करत न्यूझीलंडवर दबाव निर्माण केला होता. मात्र, याच दरम्यान तिसऱ्या पंचांच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे कर्णधार शुबमन गिल अत्यंत संतापलेला दिसला. त्याने थेट मैदानी पंचांशी चर्चा करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
३१ व्या षटकात बुमराहच्या चेंडूवर जोरदार अपील; गिलने घेतला डीआरएस
ही नाट्यमय घटना न्यूझीलंडच्या डावातील ३१ व्या षटकात घडली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आत वळणारा एक भेदक चेंडू थेट ग्लेन फिलिप्सच्या पॅडवर जाऊन आदळला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले, परंतु मैदानी पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले. यानंतर गिलने बुमराहशी सविस्तर चर्चा केली; चेंडू बॅटला लागला नसल्याची खात्री वाटल्याने भारतीय कर्णधाराने तात्काळ डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय घेतला.
स्निकोमीटरवरील स्पाइक आणि थर्ड अंपायर यांचा निर्णायक कौल –
Phillips was OUT? https://t.co/e3Gt3SbxJV
— Sachin Padha (@sachin_padha) November 19, 2026
रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या जवळून जात असताना स्निकोमीटरवर एक स्पष्ट स्पाइक दिसून आला, जरी बाजूच्या कॅमेऱ्यातून बॅटची कडा स्पष्ट दिसत नव्हती. तिसरे पंच पॉल रायफेल यांनी विविध कोनांतून स्लो-मोशन फुटेज तपासल्यानंतर चेंडूच्या दिशेत सूक्ष्म बदल (डिफ्लेक्शन) झाल्याचे निरीक्षण नोंदवले आणि मैदानी पंचांचा नाबाद राहण्याचा मूळ निर्णय कायम ठेवला.
मैदानी पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याशी गिलची जोरदार चर्चा
🚨 CONTROVERSIAL UMPIRING DECISION IN IND vs NZ TEST! 😱
India took a DRS for LBW against Glenn Phillips off Jasprit Bumrah’s bowling.
Snickometer showed a big spike as the ball passed the bat. However, the front-on replay appeared to show a significant gap between the bat and the ball.
😳 Despite this, third umpire Paul Reiffel ruled that there was a slight inside edge and upheld the on-field not-out decision, allowing Glenn Phillips to survive!
🔥 Indian captain Shubman Gill was visibly unhappy with the decision!
Image Credit: Sonyliv
#INDvsNZ #NZvsIND #DRS #TestCricket
— CricInformer (@CricInformer) November 19, 2026
तिसऱ्या पंचांचा हा अनपेक्षित निर्णय पडद्यावर झळकताच शुबमन गिल अजिबात समाधानी दिसला नाही. बॅट आणि चेंडू यांच्यात स्पष्ट अंतर असून चेंडू थेट पॅडला लागला असल्याचा दावा करत गिलने तात्काळ मैदानी पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याकडे जाऊन आपले म्हणणे मांडले; मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय अंतिम असल्याने निराश मनाने मान हलवत गिलला माघारी परतावे लागले.
बुमराहच्या भेदक माऱ्यातून फिलिप्स बचावला; सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप
जसप्रीत बुमराहच्या या उत्कृष्ट चेंडूवर पायचीत होण्यापासून ग्लेन फिलिप्स थोडक्यात बचावला आणि भारताची एक महत्त्वाची संधी हुकली. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयामुळे भारतीय संघात तीव्र निराशा पसरली असतानाच, सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हा निर्णय टीम इंडियावर झालेला मोठा अन्याय असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे.





