IND vs WI : रवींद्र जडेजाचा अहमदाबादमध्ये जलवा; धोनीच्या शतकी रेकॉर्डशी केली बरोबरी!

Ravindra Jadeja 6th Test Century : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शानदार शतकी खेळी केली. जडेजाने 2025 या वर्षात गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हे त्याचे यंदाचे दुसरे शतक आहे. या शतकासह त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या 6 कसोटी शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
जडेजाने झळकावले कसोटीतील सहावे शतक –
गेल्या काही वर्षांपासून रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या आणि परदेशी मैदानांवर अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली छाप सोडली आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक आहे. यासह त्याने एमएस धोनीच्या 6 शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. 2025 मध्ये जडेजाने क्रमांक-6 किंवा त्याखालील स्थानावर फलंदाजी करताना 7 वेळा 50 हून अधिक धावांची खेळी केली आहे. यासह त्याने व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या 2002 मधील रेकॉर्डशीही बरोबरी केली, ज्यांनी 23 डावांमध्ये 7 वेळा अशी कामगिरी केली होती.
क्रमांक-6 वर हजार धावांचा टप्पा –
Blade of brilliance! 🏏#RavindraJadeja proves why he’s the No.1-ranked Test all-rounder with a commanding ton! 💯
Catch the LIVE action ➡ https://t.co/h0R35hjT69#INDvWI 1st Test, Day 2 👉 LIVE NOW on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/3Gxsi8ml1Y
— Star Sports (@StarSportsIndia) October 3, 2025
रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून क्रमांक-6 वर फलंदाजी करताना 1000 धावा पूर्ण करणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्थानावर त्याने 26 डावांमध्ये 56.72 च्या सरासरीने 1020 हून अधिक धावा केल्या आहेत. जडेजापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, युवराज सिंग, रवी शास्त्री, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनी या स्थानावर हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs WI : ध्रुव जुरेलने ठोकले पहिले कसोटी शतक! वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा भारतीय
रवींद्र जडेजाच्या या शानदार खेळीमुळे भारताने सामन्यात मजबूत पकड मिळवली आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 448 धावा केल्या असून 286 धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदर 9 आणि रवींद्र जडेजा 104 धावांवर नाबाद आहेत. जडेजाच्या या कामगिरीने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला असून, तो पुढील डावांमध्येही असाच फॉर्म कायम ठेवेल, अशी अपेक्षा आहे.





