Justin Greaves Century : जस्टिन ग्रीव्हजचे दमदार शतक! कारकिर्दीतील पहिल्या शतकासह रचला इतिहास; गेल-चंद्रपॉलच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री
Justin Greaves Century : वेस्ट इंडिजचा सलामीवीर जस्टिन ग्रीव्ह्सने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक संस्मरणीय खेळी केली. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत पहिल्यांदाच १०० धावांचा टप्पा गाठला.

IND vs WI 1st ODI Justin Greaves Maiden Century Thiruvananthapuram Elite Club Record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच लढतीत विंडीजचा सलामीवीर जस्टिन ग्रीव्हजने (Justin Greaves) आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी साकारली आहे. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ग्रीव्हजने अवघ्या १०४ चेंडूंत पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. २०२२ मध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि आपल्या २६ व्या सामन्यात त्याने हा जादुई टप्पा ओलांडून टीकाकारांना बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.
१०८ चेंडूंत १०१ धावा; ४ वर्षांच्या संघर्षाचे अखेर चीज!
या ऐतिहासिक खेळीदरम्यान ग्रीव्हजने १०८ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या मदतीने १०१ धावांची दिमाखदार खेळी साकारली. या सामन्यापूर्वी खेळलेल्या २५ एकदिवसीय सामन्यांत त्याच्या नावावर अवघे एक अर्धशतक जमा होते. मात्र, भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच त्याने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख संगम साधत सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण केला आणि आपल्या कारकिर्दीला नवी दिशा दिली.
ख्रिस गेल, चंद्रपॉलच्या एलिट क्लबमध्ये स्थान; ३८ वर्षांनंतर तोच पराक्रम!
Ravindra Jadeja to Justin Greaves, 1 run,
Maiden ODI hundred for Justin Greaves!
Fantastic Inning from Justin Greaves.#INDvWI #TeamIndia #FIFAASEANCup pic.twitter.com/MWmFkbayPv
— Bhadresh Prajapati (@bhadresh_33) September 27, 2026
भारताच्या भूमीवर भारताच्याच विरुद्ध एकदिवसीय शतक ठोकणारा ग्रीव्हज हा वेस्ट इंडिजचा केवळ सहावा सलामीवीर ठरला आहे. या कामगिरीसह तो गॉर्डन ग्रिनिज, ख्रिस गेल, फिल सिमन्स, शाई होप आणि शिवनारायण चंद्रपॉल या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला. विशेष म्हणजे, तब्बल ३८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८८ मध्ये फिल सिमन्स यांनी याच तिरुवनंतपुरमच्या मैदानावर सलामीवीर म्हणून शतक झळकावले होते; आता ग्रीव्हजने नेमकी त्याच शहरात इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
पहिल्या शतकासाठी ३२ वर्षे २१३ दिवस; तिसरा सर्वात वयस्कर कॅरेबियन फलंदाज!
वयाच्या ३२ व्या वर्षी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावत ग्रीव्हजने वेस्ट इंडिजच्या रेकॉर्ड बुकमध्येही स्थान मिळवले आहे. विंडीजकडून कारकिर्दीतील पहिले शतक ठोकणाऱ्या सर्वात वयस्कर फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत क्लेटन लँबर्ट (३६ वर्षे ५७ दिवस) पहिल्या, तर शामार ब्रुक्स (३३ वर्षे २४६ दिवस) दुसऱ्या स्थानावर आहेत.





