IND vs SL : टीम इंडियाने ठोकला विजयाचा षटकार! श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये केले चारीमुंड्या चीत

India defeated Sri Lanka in the Super Over : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ टप्प्यातील अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात रोमांचक सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५ विकेट गमावत २०२ धावांचा भक्कम आकडा गाठला होता. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या पथुम निसांकाच्या वादळी शतकी खेळीमुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. मात्र, येथे भारताने बाजी मारली.
विशेष म्हणजे हा फक्त औपचारिक सामना होता. कारण भारतीय संघाने अगोदरच फायनलमध्ये धडक मारली आहे. तसेच श्रीलंकेचा याआधीच आशिया कप मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही. भारताने या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना विश्रांती देत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी सोपवली होती. फलंदाजीत अभिषेक शर्माने 22 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
Unbeaten run in the #AsiaCup2025 continues 🙌
On to the #Final 💪 🔜
Scorecard ▶️ https://t.co/FSv1q3IqCa#TeamIndia | #Super4 | #INDvSL pic.twitter.com/cNacwS1jJh
— BCCI (@BCCI) September 26, 2025
त्यानंतर तिलक वर्माने 34 चेंडूत नाबाद 49 धावा आणि संजू सॅमसनने 39 धावांचे योगदान दिले, ज्यामुळे भारताला 202 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळाले. श्रीलंकेकडून गोलंदाजीत चरित असालंका, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुष्मंथा चमिरा आणि महिश तीक्ष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत प्रभावी कामगिरी केली.
हेही वाचा – IND vs SL : अभिषेक शर्माचा मोठा धमाका! एकाच झटक्यात विराट-रोहितच्या ‘या’ खास विक्रमांची केली बरोबरी
पथुम निसांकाचे वादळी शतक –
A Super fight and A Super Win!
Updates ▶️ https://t.co/xmvjWCaN8L#TeamIndia | #AsiaCup2025 | #Super4 | #INDvSL pic.twitter.com/J0VAgHsVUl
— BCCI (@BCCI) September 26, 2025
203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. कुसल मेंडिस शून्य धावांवर बाद झाला. मात्र, पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या आशा जिवंत ठेवल्या. कुसल परेरा 32 चेंडूत 58 धावा काढून बाद झाला. पथुम निसांकाने 52 चेंडूत शतक पूर्ण केले, पण शेवटच्या षटकात 58 चेंडूत 107 धावा काढून तो बाद झाला. श्रीलंकेला शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती, पण त्यांना 11 धावाच करता आल्या आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला.
हेही वाचा – IND vs SL : महिश तीक्ष्णाची कमाल! आपल्याच गोलंदाजीवर हवेत झेप घेत पकडला गिलचा अप्रतिम कॅच, पाहा VIDEO
सुपर ओव्हरमध्ये भारताने मारली बाजी –
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला अर्शदीप सिंगच्या षटकात 5 चेंडूत केवळ 2 धावा करता आल्या आणि त्यांनी दोन विकेट्स गमावल्या. भारताने वानिंदु हसरंगाच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तीन धावा काढत सामना जिंकला. या विजयासह भारताने या स्पर्धेतील सलग सहावा विजय मिळवला, तर श्रीलंकेला त्यांच्या शेवटच्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला. आता 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघांत आशिया कप 2025 चा फायनल सामना खेळला जाणार आहे.





