Jemimah Rodrigues : जेमिमा रॉड्रिग्जने रचला इतिहास, भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारी ठरली तिसरी महिला खेळाडू

Jemimah Rodrigues Scores Third Fastest ODI Century for India : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत आहे, जिथे श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ७ मे रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते. ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा २३ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आता फायनलमध्ये त्यांचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान या सामन्यात भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने शतकी खेळी साकारली. मात्र या खेळीच्या जोरावर तिने एका खास पराक्रम केला.
जेमिमा रॉड्रिग्जने रचला इतिहास –
या शतकासह, जेमिमा रॉड्रिग्ज एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक करणारी ती तिसरी फलंदाज ठरली आहे. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. चोवीस वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जने १०१ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२३ धावा केल्या. जेमिमाचा हा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे. यापूर्वी, जेमिमाने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १०२ धावा करून तिच्या ७ वर्षांच्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर आता त्याचे दुसरे शतक झाले आहे.
जेमिमाने झळकावले वनडेतील तिसरे जलद अर्धशतक –
Jemimah Rodrigues wins the Player of the Match Award! 🙌 🙌#TeamIndia beat South Africa by 23 runs and seal a place in the #WomensTriNationSeries2025 Final! 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/V5htnun1j2#INDvSA | @JemiRodrigues pic.twitter.com/mYgza8Olsk
— BCCI Women (@BCCIWomen) May 7, 2025
जेमिमा रॉड्रिग्जने शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८९ चेंडूत शतक पूर्ण केले. महिला क्रिकेटमध्ये भारताकडून हे तिसरे सर्वात जलद शतक आहे. या विक्रमात तिच्या आधी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांची नावे येतात. स्मृती मानधनाने या वर्षी आयर्लंडविरुद्ध फक्त ७० चेंडूत सर्वात जलद शतक ठोकले. त्याच वेळी, हरमनप्रीत कौरने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८७ चेंडूत शतक झळकावले होते.
हेही वाचा – MI vs GT : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर मोठा दणका! हार्दिक पंड्यासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड
भारतासाठी महिला क्रिकेटमधील सर्वात जलद एकदिवसीय शतक :
७० चेंडू – स्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड (२०२५)
८७ चेंडू – हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२४)
८९ चेंडू – जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२५)
९० चेंडू – हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१७)
९० चेंडू – जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध आयर्लंड (२०२५)
हेही वाचा – IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरचा IPL वेळापत्रकावर परिणाम, फ्रँचायझी चिंतेत, काय आहे कारण?
सामन्याबद्दल बोलायचे तर भारताने प्रथम फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकी खेळीच्या जोरावर ९ बाद ३३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरातदाखल दक्षिण आफ्रिका संघ ७ बाद ३१४ धावाच करु शकला. भारतासाठी अमनजोत कौरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माने २ तर प्रतिका-श्रीने प्रत्येकी एक विकेट्स घेतली. ११ मे रोजी भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघात अंतिम सामना खेळला जाईल.





