Dhruv Jurel and Rishabh Pant Both will play in IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेट यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या एका महत्त्वपूर्ण खुलाशानुसार, भारतीय संघ या कसोटीत दोन यष्टिरक्षक फलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल एकत्र खेळणार! सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेट यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गेम प्लॅनबद्दल बोलताना ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे ध्रुव जुरेल संघात कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे जुरेल आणि नुकताच संघात परतलेला ऋषभ पंत हे दोघेही एकाच वेळी प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील. रायन नील टेन डोशेट म्हणाले, “ध्रुव जुरेल आणि पंत एकत्र खेळताना दिसले नाहीत तर ते आश्चर्यचकीत करणारे ठरेल. ध्रुव गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. मागच्या आठवड्यात त्याने बंगळुरूच्या मैदानावर दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार हे निश्चित आहे.” हेही वाचा – ICC ODI Rankings : आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर! विराट कोहलीने न खेळताच बाबर आझमला टाकलं मागे १९८६ नंतर पहिल्यांदाच अशी रणनीती – या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक जुना विक्रम मोडला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ध्रुव जुरेल यष्टिरक्षक म्हणून खेळला होता, तर नितीश कुमार रेड्डी संघाचा भाग होता. ऋषभ पंतच्या पुनरागमनानंतर जुरेलला केवळ फलंदाज म्हणून खेळवले जाईल का, याबद्दल चर्चा होती. मात्र, आता नितीश कुमार रेड्डीला बाहेरचा रस्ता दाखवून जुरेलला कायम ठेवण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. हेही वाचा – PAK vs SL : इस्लामाबादमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात १२ ठार; तरी क्रिकेट सुरू, श्रीलंकन संघाला दिले ‘आर्मी’ गार्ड! यामुळे, १९८६ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ कसोटी सामन्यात दोन मुख्य यष्टिरक्षक फलंदाजांना घेऊन मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंत संघाचा प्रमुख यष्टिरक्षक म्हणून भूमिका बजावेल, तर ध्रुव जुरेल फलंदाजी आणि पर्यायी यष्टिरक्षण म्हणून संघात महत्त्वाची भूमिका पार पाडेल.