IND vs SA : अर्शदिप सिंहच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

IND vs SA : न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअममध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात आज दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा स्टार बॉलर अर्शदिप सिंहच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. त्याने या सामन्यात 13 बॉलची ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्याने 7 व्हाईट टाकले होते.हि ओव्हर पाहून गौतम गंभीरने डोक्यावर हात मारून घेतला. ही घटना 11 व्या ओव्हर दरम्यान घटना घडली.
अर्शदिपच्या पहिल्याच बॉलवर क्विटन डि कॉकने षटकार मारला होता. या षटकारानंतर दोन वाईड आणि एक डॉट बॉल त्याने काढला.त्यानंतर त्याने परत चार वाईड टाकले त्यानंतर शेवटच्या बॉल आधी देखील त्याने एक वाईड टाकला.अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये सात वाईड टाकले आहे.
टी – 20 मध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक टाकलेले बॉल
13- नवीन-उल-हक विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, 2024
13 – अर्शदीप सिंग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुल्लनपूर, 2025*
12- सिसंदा मगाला विरुद्ध पाकिस्तान, जोहान्सबर्ग, 2021
अर्शदिपने एकाच ओव्हरमध्ये 13 बॉल टाकले आहे. त्याच 7 वाईट आणि एक मिळून अर्शदिपने एका ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अर्शदिपची ही टी फॉरमॅटमधली दुसरी सर्वाधिक ओव्हर ठरली आहे. याआधी अफगाणिस्तानच्या नवीन उल हकन झिंम्बाबे विरूद्ध 13 बॉलची ओव्हर टाकली होती. ही घटना 2024 ला घडली होती.त्याच्यानंतर अर्शदिपचा नंबर लागतो.





