IND vs SA 3rd T20 : दोन्ही संघ आघाडी घेण्यासाठी सज्ज..! जाणून घ्या प्लेइंग XI, पिच रिपोर्ट अन् मॅच प्रिडिक्शनसह सर्व डिटेल्स एका क्लिकवर…..

South Africa vs India 3rd T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी 20 सामना हा सेंच्युरियन येथे होणार आहे. उभयसंघ या 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकून कोणता संघ आघाडी घेणार? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. सामन्याचा नाणेफेक 8 वाजता होणार आहे.
भारतीय संघाने मालिकेतील पहिला टी-20 सामना 61 धावांनी जिंकला होता. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या टी-20मध्येही विजयाच्या जवळ पोहोचली, पण शेवटी गेराल्ड कोएत्झी आणि ट्रस्टन स्टब्स यांनी सामन्याचं चित्र पालटून टाकलं. दक्षिण आफ्रिकेला हरवलेला सामना जिंकून दिला.
IND vs SA 3rd T20 : पिच रिपोर्ट…
सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी योग्य आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी मिळते. गेल्या काही वर्षांत सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर पूर्वीपेक्षा अधिक वेग आणि उसळी पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज या खेळपट्टीवर कहर करू शकतात. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
IND vs SA 3rd T20 : मॅच प्रिडिक्शन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना एकतर्फी झाला, मात्र दुसऱ्या टी-20मध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. आजचा सामनाही उत्कंठापूर्ण असेल. आजच्या सामन्याबदल बोलयाचे झाले तर, हा सामनाही चुरशीचा होईल. दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयाची शक्यता थोडी जास्त असली तरी भारतीय खेळाडू पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करू शकतात.
1st T20I – India won by 61 runs
2nd T20I – South Africa won by 3 wickets
3rd T20I – ❓ pic.twitter.com/VGOSgYv8ZE— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 13, 2024
IND vs SA : हेड-टू-हेड रेकाॅर्ड
खेळले गेलेले सामने : 29,
भारत विजयी : 16,
द. आफ्रिका विजयी : 12,
निकाल नाही : 1
IND vs SA : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….
टीम इंडिया या मालिकेत चार सामने खेळणार आहे. स्पोर्ट्स 18 (Sports 18) आणि कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) या टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. जर प्रेक्षकांना दुसरा टी-20 सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. यासाठी तुम्हाला जियो सिनेमा (Jio Cinema) ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.
IND vs SA 3rd T20 : संभावित प्लेईंग 11
भारतीय संघ – संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.
द. आफ्रिका संघ – रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी आणि नाकाबायोमझी पीटर.





