IND vs SA 1st T20I : कसोटीनंतर आता T20 चा थरार..! भारतीय संघ आज द. आफ्रिकेशी भिडणार, जाणून घ्या कुठे आणि कसा Free मध्ये पहायचा Live सामना…

IND vs SA T20I Series 2024 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली. यानंतर आफ्रिकन संघाचा एकमेव कसोटी सामन्यातही पराभव झाला. आता दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका आजपासून सुरू होणार आहे.
पहिला सामना आज म्हणजेच 5 जुलै रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. भारतीय संघाला टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी करायची आहे. तर जाणून घेऊया की, या टी-20 मालिकेतील सामने कुठे लाईव्ह पाहता येतील…
🟢🟡Match Day | SAWvINDW
Watch our Proteas Women take India head-on in a 3-match T20I Series!!
Let’s cheer on our Proteas as they aim to end their tour with a series win! 👏
🏟️ MA Chidambaram Stadium, Chennai
📺 SS Grandstand (Ch 201)
🕛 15:30🇿🇦vs🇮🇳#AlwaysRising #WozaNawe… pic.twitter.com/5hp3s1iWI1
— Proteas Women (@ProteasWomenCSA) July 5, 2024
स्पोर्ट्स 18 चॅनलवर तुम्ही भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुम्ही जिओ सिनेमावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना विनामूल्य पाहू शकता यासाठी तुम्हाला फक्त तुमचा डेटा खर्च करावा लागेल.
भारतीय महिला खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी वनडे मालिकेत शतके झळकावली होती. त्यावेळी मंधानाने सलग दोन सामन्यात शतके झळकावली होती. याशिवाय शेफाली वर्माने कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याच्यामुळेच टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. आता टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी या खेळाडूंवर असेल.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक:
5 जुलै : पहिला T20, चेन्नई, संध्याकाळी 7 वा.
7 जुलै : दुसरी T20, चेन्नई, संध्याकाळी 7 वा.
9 जुलै : तिसरा T20, चेन्नई, संध्याकाळी 7 वा.
टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघांचा संघ :
भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, रा. , अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनी डेर्कसेन, मिके डी रिडर, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, सनी लुस, एलिस-मेरी मार्क्स, नॉनकुलुलेको म्लाबा , तुमी सेखुखुणे , क्लो ट्रायोन.





