Emerging Teams Asia Cup 2024 : टीम इंडियाचा थरारक विजय, अतितटीच्या लढतीत पाकला 7 धावांनी केलं पराभूत…

Emerging Teams Asia Cup 2024 (India Beats Pakistan) : ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या इमर्जिंग आशिया कप 2024 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकात 7 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता, ज्यामध्ये भारताने प्रथम खेळताना निर्धारित 20 षटकात 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ केवळ 176 धावा करू शकला आणि 7 धावांनी सामना गमावला.
भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारत-अ संघाकडून अंशुल कंबोजने सर्वाधिक बळी घेत पाकिस्तान संघाच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अंशुल कंंबोज सामन्याचा मानकरी ठरला. भारताचे पुढील सामने 21 ऑक्टोबरला युएई (UAE) आणि 23 ऑक्टोबरला ओमानशी होणार आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ 21 ऑक्टोबरला ओमान आणि 23 ऑक्टोबरला यूएईशी भिडणार आहे.
🔥💪🏻 ANOTHER DAY, ANOTHER WIN OVER PAKISTAN! India A registered a comfortable victory over the arch-rivals in the ACC Men’s T20 Emerging Teams Asia Cup 2024.
🗓️ The boys will next face UAE on Oct 21st. #ACC #MensT20EmergingTeamsAsiaCup #TeamIndia #BharatArmy #COTI🇮🇳 pic.twitter.com/BdYW3pxftQ
— The Bharat Army (@thebharatarmy) October 19, 2024
भारत-अ संघाने पाकिस्तान-अ संघासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून कर्णधार तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या, ज्याने 35 चेंडूत 2 चौकार अन् 2 षटकारासह 44 धावा केल्या. त्याच्याशिवाय प्रभसिमरन सिंगने 19 चेंडूत (3 चौकार अन् 3 षटकार) 36 आणि अभिषेक शर्माने 22 चेंडूत (5 चौकार अन् 2 षटकार) 35 धावांची झटपट खेळी खेळली. निहाल वढेरा आणि रमनदीप सिंह यांनी अनुक्रमे 25 आणि 17 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून गोलंदाजीत सुफियान मुकीमने दोन गडी बाद केले. तर मोहम्मद इम्रान, जमान खान, अराफत मिन्हास आणि कासिम अक्रम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
विजयासाठी 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाची धावसंख्या 6 असताना कर्णधार मोहम्मद हारिसच्या रूपात पाकला पहिला धक्का बसला तर दुसरी विकेटही 21 धावसंख्येवर पडली. यानंतर यासिर खानच्या 22 चेंडूत 33 धावा, अराफत मिन्हासच्या 29 चेंडूत 41 धावा, अब्दुल समदच्या 15 चेंडूत 25 धावा आणि अब्बास आफ्रिदीच्या 9 चेंडूत 18 धावांमुळे सामना रोमहर्षक स्थितीत आला होता, पण अखेरच्या षटकात अंशुल कंबोजने 17 धावांचा बचाव केला आणि भारताने 7 धावांनी विजय मिळवला.
IND vs NZ 1st Test : बेंगळुरू कसोटीत न्यूझीलंडचा विजय, भारताचा 8 विकेट्सनी पराभव करत रचला इतिहास…
भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर अंशुल कंबोज सर्वात प्रभावी ठरला. त्याने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले. त्यांच्याशिवाय रसिक दार सलाम आणि निशांत सिंधूने 2-2 बळी घेतले.





