IND vs PAK : गौतम गंभीरच्या निर्देशाने IND vs PAK सामन्यात नवा वाद, हस्तांदोलनावरुन खळबळ! पाहा VIDEO

IND vs PAK Gautam Gambhir Video Viral : आशिया कप 2025 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सुपर फोर सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. मात्र, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याने आणि अंपायरांशी हस्तांदोलन विसरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यासंदर्भात भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सामन्यानंतर नक्की काय घडलं?
भारताच्या विजयानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंना थेट ड्रेसिंग रूममध्ये जाण्याचे निर्देश दिले. मात्र, नंतर त्यांनी सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंना पुन्हा मैदानावर पाठवले आणि फक्त अंपायरांशी हस्तांदोलन करण्यास सांगितले, पाकिस्तानी खेळाडूंशी नाही. ही घटना पाकिस्तानी खेळाडूंना धक्कादायक वाटली. विशेष म्हणजे, सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळीही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन केले नव्हते.
गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरल –
🗣️ Arey umpire se to mil loo!!
Gautam Gambhir invited the Indian players to exchange handshakes—but only with the umpires 😂pic.twitter.com/iBkdhye87j
— KKR Karavan (@KkrKaravan) September 21, 2025
व्हायरल झालेल्या व्हिडीओत कोच गौतम गंभीर स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत, “अरे, अंपायरांशी तरी हस्तांदोलन करा.” गंभीर यांनी नंतर इंस्टाग्रामवर भारतीय खेळाडूंचा फोटो शेअर करत ‘Fearless’ (निडर) असा कॅप्शन लिहिला, ज्यामुळे त्यांच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. गंभीर यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून खेळाडूंमध्ये आक्रमकतेचा नवा स्तर दिसून येत आहे.
हेही वाचा – Asia Cup 2025 : भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानला पडला महागात! आता फक्त शेवटची संधी? जाणून घ्या समीकरण
नव्या वादाची शक्यता –
Gautam Gambhir to Team India players:
“At least shake hands with the umpires!” 😆🤝#INDvPAK #GautamGambhir #CricketTwitter #AsiaCup
pic.twitter.com/SDaVugIY0H— Rana Ahmed (@RanaAhmad056) September 22, 2025
भारतीय खेळाडूंच्या या वर्तनाने सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली आहे. गंभीर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची आक्रमकता आणि खेळातील शिस्त यावर प्रशंसा होत असली, तरी अंपायरांशी हस्तांदोलन विसरणे आणि पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळण्याच्या निर्णयाने क्रिकेट विश्वात नव्या वादाला जन्म दिला आहे.
हेही वाचा – रॉबिन उथप्पा ईडी कार्यालयात दाखल ;ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी चौकशी सुरु
भारताचा पुढील सामना बांगलादेशशी होणार –
सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली. सलामीवीर शुबमन गिल (47) आणि अभिषेक शर्मा (74) यांनी 59 चेंडूत 105 धावांची भागीदारी करत भारताला 172 धावांचे लक्ष्य सहज पार करुन दिले. सुपर फोर टप्प्यात भारताचा पुढील सामना बुधवारी (24 सप्टेंबर 2025) बांगलादेशविरुद्ध होईल, तर पाकिस्तान मंगळवारी (23 सप्टेंबर 2025) श्रीलंकेशी भिडेल. जर भारताने बांगलादेशला पराभूत केले, तर 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यातील त्यांचे स्थान जवळपास निश्चित होईल. सुपर फोरमधील अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळतील.





