IND vs PAK Final : भारताचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय! प्लेइंग इलेव्हनमध्ये केले तीन मोठे बदल

IND vs PAK Final Updates : आशिया कप 2025 चा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्याची निर्णायक नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहे, तर पाकिस्तान संघाने कोणताही बदल केलेला नाही.
भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल –
कर्णधार सूर्यकुमार यादवने दुखापतीमुळे हार्दिक पंड्या खेळणार नसल्याचे जाहीर केले. भारताने तीन बदल केले. हार्दिकची जागा रिंकू सिंगने घेतली आहे. अर्शदीप सिंगची जागा जसप्रीत बुमराहने घेतली आणि हर्षित राणाची जागा शिवम दुबेने घेतली. भारतीय संघाने चालू स्पर्धेत आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला दोनदा पराभूत केले आहे आणि आता पाकिस्तानविरुद्ध विजयाची हॅटट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दोन्ही संघ टी-20 आशिया कप विजेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहेत.
भारत-पाक पहिल्यांदाच आशिया कप फायनलमध्ये आमनेसामने –
आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आशिया कप 2025 फायनलमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. भारताने विक्रमी आठ वेळा विजेतेपद जिंकले आहे आणि तो गतविजेता आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने 2012 पासून ट्रॉफी जिंकलेली नाही! दोन आठवड्यांच्या कालावधीत दोन्ही देश एकमेकांसमोर येण्याची ही तिसरी वेळ असेल.
हेही वाचा – IND vs PAK Final : भारताचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय! प्लेइंग इलेव्हनमध्ये केले तीन मोठे बदल
भारतीय प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : साहिबझादा फरहान, फखर झमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.





