IND vs NZ : कोण आहे ती ‘मिस्ट्री गर्ल’? जिच्यासोबत युझवेंद्र चहल भारत-न्यूझीलंड फायनल पाहिला पोहोचला, पाहा PHOTOS

IND vs NZ Yuzvendra Chahal spot with mystery girl in Champions Trophy final : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २५१ धावा केल्या असून भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना पाहण्यासाठी भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल देखील एका खास व्यक्तीसोबत पोहोचला आहे, तो एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत स्टँडमध्ये बसलेला दिसला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे? जाणून घेऊया.
युझवेंद्र चहलचे ‘मिस्ट्री गर्ल’सोबतचे फोटो व्हायरल –
जेव्हा न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता, तेव्हा युझवेंद्र चहल एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत स्टँडमध्ये बसलेला दिसला, त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. नुकताच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट झाला आहे. दोघेही बऱ्याच काळापासून वेगळे राहत होते. आता युजवेंद्र चहल कोणत्या मुलीसोबत बसला आहे, ती त्याची प्रेयसी आहे की फक्त मैत्रीण आहे? सोशल मीडियावर चाहते असे प्रश्न विचारत आहेत. काही युजर्स असा अंदाज लावत आहेत की धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर चहल पुन्हा प्रेमात पडला आहे आणि तो या मुलीला डेट करत आहे.
Yuzvendra Chahal ki nayi bandi!🌚#INDvsNZ pic.twitter.com/fNc7WTu43Q
— Chauhan (@Platypuss_10) March 9, 2025
कोण आहे मिस्ट्री गर्ल’?
युजवेंद्र चहलसोबत स्टँडमध्ये बसलेली मुलगी एक इन्फ्लुएन्सर युट्यूबर आहे, जी एक रेडिओ जॉकी देखील आहे. तिचे नाव आरजे महवाश आहे, ती याआधीही युजवेंद्र चहलसोबत दिसली आहे. याधी या दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाला होता, तेव्हाही लोकांनी असे गृहीत धरले होते की धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर चहल आरजे महवाशला डेट करत आहे. मात्र, महवशने तिच्या इंस्टाग्रामवर या बातम्या निराधार असल्याचे म्हटले होते.
Is she the new Bhabhi? pic.twitter.com/nMokM1SA3d
— Digital मारवाड़ी (@digital_marwadi) March 9, 2025
Chahal bhai ki khusi bhi ab kisi se dekhi nahi ja rhi hai.. Najar na lge dono ko
— M.Chandra⚔️ (@mastermorality_) March 9, 2025
न्यूझीलंडने भारताला दिले २५२ धावांचे लक्ष्य –
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा केल्या. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि २ षटकार आले. तर डॅरिल मिशेलने १०१ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आले. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्तीने १० षटकांत ४५ धावा दिल्या आणि कुलदीप यादवने १० षटकांत ४० धावा दिल्या. तर हार्दिक पंड्याने ३ षटकांत ३० धावा दिल्या आणि मोहम्मद शमीने ९ षटकांत ७४ धावा दिल्या.





