IND vs NZ : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा..! जाणून घ्या, ODI Series चे संपूर्ण वेळापत्रक….

India Women vs New Zealand Women : भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज पॉली इंग्लिस हिला प्रथमच न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे.
पॉली इंग्लिसने देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे निवडकर्त्यांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून केंद्रीय करार मिळवण्यातही ती यशस्वी ठरली आहे. इंग्लिस या 28 वर्षीय खेळाडूला जूनमध्ये प्रथम राष्ट्रीय करारामध्ये सामावेश करण्यात आला होता.
पॉली इंग्लिसच्या बरोबरीने प्रसूतीनंतर लॉरेन डाऊन देखील संघात परतली आहे. तसेच पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेली न्यूझीलंड संघाची वेगवान गोलंदाज रोझमेरी मेयरला विश्रांती देण्यात आली आहे. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 विजेत्या संघाचे सदस्य असलेले मेयर्स आणि ऑफ-स्पिनर लेह कॅस्परेक हे दोनच खेळाडू आहेत ज्यांना या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.
Next up! 🇮🇳 Watch LIVE in NZ on @skysportnz 📺 Live scoring at https://t.co/DibXOCLmmf & the NZC App📲 #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/Qzj4Q1xTwV
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) October 22, 2024
मालिकेचे वेळापत्रक…
भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना 24 ऑक्टोबरला तर दुसरा सामना 27 ऑक्टोबरला असेल. तर मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 29 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. तसेच भारत-न्यूझीलंड मालिकेतील हे तिन्ही वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवले जातील. तिन्ही सामने हे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंड महिला एकदिवसीय संघ : सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, पॉली इंग्लिस (यष्टिरक्षक), फ्रॅन जोनास, जेस केर, मेली केर, मॉली पेनफोल्ड , जॉर्जिया प्लिमर, हॅना रोवे, ली ताहुहू.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दयानिधी हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव आणि श्रेयंका पाटील.





