#CWC2023 #INDvNZ Semifinal 1 : भारताला पहिला व मोठा धक्का; कर्णधार रोहित शर्मा माघारी…

India Vs New Zealand World Cup 1st Semi Final 2023 Live Cricket Score: विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया उतरेल.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाा. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोङीनं आक्रमक सुरूवात केली. सात षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 61 इतकी झाली होती.
त्यानंतर 8.2 षटकात भारताची पहिली विकेट 71 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करत असताना तो केन विल्यमसनच्या हाती झेलबाद झाला. हा झेल खूप अवघड होता, पण विल्यमसनने अप्रतिम झेल घेतला. आता विराट कोहली शुभमन गिलसोबत क्रीजवर आहे. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या 75/1 आहे.
दरम्यान,रोहित शर्माने या सामन्यात तीन षटकार ठोकले असून विश्वचषकात 50 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाराही तो खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 28 षटकारांसह सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. या बाबतीतही त्याने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार मारणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले.
रोहित शर्मा वेगाने धावा करत असून तो अर्धशतकाच्या जवळ आहे. सात षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 61 इतकी झाली आहे.





