IND vs NZ : धावफलकावर ० धावा अन् ३ विकेट्स! रोहित, विराट आणि श्रेयस तिघेही भोपळ्यावर बाद; भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली शून्यावर बाद झाले, त्यामुळे भारताच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स पडल्या.

IND vs NZ India 0 For 3 Record Rohit Sharma Virat Kohli Shreyas Iyer Duck Matt Henry 4th ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर एका अत्यंत लाजिरवाण्या आणि ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. ३३४ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारताने अवघ्या ० धावांवर आपले तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा संघाचे खाते उघडण्यापूर्वीच तीन गडी बाद झाले. माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि पदार्पणातच नेतृत्व करणारा कर्णधार श्रेयस अय्यर हे तिघेही दिग्गज भोपळाही न फोडता तंबूत परतल्याने क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का बसला.
मॅट हेन्रीचा पहिल्याच षटकात कहर; तिघांना धाडले माघारी
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडने विल यंगच्या शानदार शतकाच्या जोरावर ३३३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात किवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने टाकलेल्या पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली पाचव्या चेंडूवर खाते न उघडता माघारी परतला, तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यरही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अशा प्रकारे मॅट हेन्रीने एकही धाव न देता पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेतल्या.
तब्बल १६ वर्षांनंतर रोहित आणि विराट एकाच सामन्यात शून्यावर बाद –
A Horrible start for india. Rohit Sharma, Virat Kohli & Shreyas Iyer all dismissed for ducks. A Maiden Triple wicket Over From Matt Henry 🔥
#INDvsNZ https://t.co/9GdVxzYfbN
— Mohini (@MohiniSmiles) November 13, 2026
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाच सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी तब्बल १६ वर्षांपूर्वी, २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हे दोघे दिग्गज खाते न उघडता बाद झाले होते; त्यावेळी वीरेंद्र सेहवागच्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर भारताने विजय मिळवला होता.
जागतिक एकदिवसीय इतिहासात पाचव्यांदाच घडला हा प्रकार –
India colleps vs NZ today.
#IndvsNZ
#Cricket
#matthenry https://t.co/Fo7XGBrkmZ— grok_SI (@HirenKhasakiya) November 13, 2026
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाचे ० धावांवर तीन विकेट्स पडण्याची ही केवळ पाचवीच वेळ ठरली आहे. यापूर्वी १९८३ आणि १९९७ मध्ये पाकिस्तानसोबत, २००३ मध्ये बांगलादेशसोबत आणि २०२६ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियासोबत अशी नामुष्की घडली होती. मात्र, भारतीय संघावर पहिल्यांदाच अशी वेळ ओढवली आहे.





