IND vs NZ : ग्लेन फिलिफ्स नव्हे, हा तर सुपरमॅन…! हवेत झेपावत घेतला आश्चर्यकारक कॅच; VIDEO होतोय व्हायरल

IND vs NZ Glenn Phillips sensational catch of Shubman Gill : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जर चॅम्पियन संघाव्यतिरिक्त सर्वात जास्त लक्षात ठेवली जाईल, तर ती म्हणजे न्यूझीलंडची क्षेत्ररक्षणसाठी. विशेषतः न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सचे नाव या स्पर्धेनंतर विसरण्याची शक्यता कमी आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक आश्चर्यकारक झेल घेणाऱ्या फिलिप्सने या सामन्यात आश्चर्यकारक झेल घेऊन चर्चेत आहे. त्याने घेतलेल्या नेत्रदीपक झेलसह ट्रेंड होत आहे. त्याने शुबमन गिलचा अप्रतिम झेल घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियासाठी धमाकेदार सुरुवात केली आणि लवकरच त्याचे अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, त्याला शुबमन गिलकडून चांगली साथ मिळत होती. दोघांमध्ये १८ षटकांत १०० धावांची भागीदारी झाली. टीम इंडिया सहज विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते आणि न्यूझीलंड पहिल्या विकेटची वाट पाहत होता. इथेच फिलिप्सने त्याच्या आश्चर्यकारक क्षेत्ररक्षणाने हे काम पूर्ण केले.
फक्त ०.७८ सेकंदात घेतला झेल –
Flying man does it again 😱
What a catch by Glenn Phillips 🫡#INDvsNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/CXlmPIJpfo
— 🅐🅣🅗🅤🅛 🕊️ (@Suryaputhra07) March 9, 2025
त्यानंतर १९ वे षटक आले, ज्यामध्ये किवी कर्णधार मिचेल सँटनर गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, गिलने जागा बनवली आणि एक्सट्रा कव्हर्सवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने चेंडू बॅटवर पूर्णपणे येण्याआधी खेळला पण फिलिप्स तिथेच थांबला होता. या किवी क्षेत्ररक्षकाने हवेत उंच उडी मारली आणि फक्त एका हाताने एक आश्चर्यकारक झेल घेतला. हा झेल पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. संपूर्ण किवी संघ फिलिप्सकडे धावला आणि त्याला मिठी मारली. फिलिप्सने हा झेल फक्त ०.७८ सेकंदात पूर्ण केला.
यापूर्वीही त्याने घेतले आहेत अप्रतिम झेल –
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिलिप्सने असा झेल घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या खेळाडूने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा झेल घेतला होता. बॅकवर्ड पॉइंट पोझिशनवरून, त्याने डावीकडे डायव्ह करून एका जबरद्सत शॉटचे झेलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर, भारताविरुद्ध, त्याने त्याच स्थितीत विराट कोहलीचा एक शानदार झेल घेतला होता. यावेळी त्याने उजवीकडे डायव्ह मारली आणि एका हाताने झेल घेतला. एकंदरीत, फिलिप्सने त्याच्या क्षेत्ररक्षणाने स्पर्धा संस्मरणीय बनवली.





