Champions Trophy Final 2025 : गोलंदाज की फलंदाज, दुबईच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व पाहिला मिळणार? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IND vs NZ Champions Trophy Final 2025 Pitch Report : १९ फेब्रुवारीपासून सुरु झालेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आठ संघांतील ही स्पर्धा१४ सामन्यांनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. ही अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताला ही स्पर्धा तिसऱ्यांदा, तर न्यूझीलंडला दुसऱ्यांदा जिंकायची आहे. या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल काय आहे? जाणून घेऊया.
दुबई स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये खूप धावा होत आहेत. दुसरीकडे, युएईमधील खेळपट्टी संथ आहे आणि फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना त्याच मैदानावर खेळवला जाईल ज्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवण्यात आला होता. ती खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. तथापि, पाकिस्तानने संथ फलंदाजी केली आणि सामना गमावला. भारताने २४२ धावांचे लक्ष्य ४२ व्या षटकातच पूर्ण केले.
दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये –
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये सलग तीन सामने जिंकून तिरंगी मालिका जिंकली होती, तर भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप केले होते. त्यानंतर भारताने गट फेरीत पहिले स्थान मिळवले. या काळात न्यूझीलंडला फक्त भारताकडूनच पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला हरवले.
चॅम्पियनस् ट्रॉफी २०२५ च्या फायनलसाठी दोन्ही संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग आणि जेकब डफी.





