IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, ‘हा’ स्टार फलंदाज दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर..

IND vs NZ 2nd Test in Pune : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी स्टार फलंदाज केन विल्यमसनच्या रूपाने न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.
बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीप्रमाणेच विल्यमसन दुखापतीमुळे पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही खेळू शकणार नाही. किवी फलंदाज सध्या त्याच्या मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे. भारताविरुद्ध पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विल्यमसन तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. विल्यमसनला वगळल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याच्य अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.
Squad News | Kane Williamson will not be available for the BLACKCAPS second Test match against India, as he continues his rehabilitation from a groin strain 🏏 #INDvNZ https://t.co/IE0uoYPZWt
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 22, 2024
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत विल्यमसनला दुखापत झाली होती. विल्यमसन न्यूझीलंडमध्ये राहून पूर्णपणे फिट (तंदुरस्त) होण्यावर काम करेल. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले की, “विल्यमसनची प्रगती होत आहे, परंतु अद्याप तो परतण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही.”
तिसऱ्या कसोटीत करू शकतो पुनरागमन…
गॅरी स्टीड म्हणाले, “आम्ही केनवर लक्ष ठेवून आहोत आणि केन योग्य दिशेने वाटचाल करत आहे, परंतु तो अजूनही 100% तंदुरुस्त नाही. आम्हाला आशा आहे की तो आणखी सुधारणा दाखवेल आणि तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल.” प्रशिक्षक पुढे म्हणाले की, न्यूझीलंडचा संघ विल्यमसनच्या तंदुरुस्तीसाठी सावधगिरी बाळगत आहे जेणेकरून त्याला पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल. आम्ही त्याला पूर्णपणे तंदरूस्त होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊ, परंतु साहजिकच आम्ही सावधगिरी बाळगणे नक्कीच सुरू ठेवू. आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही.”
IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या टेस्टसाठी पुण्यात पोहोचली टीम इंडिया, Video मध्ये पाहा खेळाडूंची धमाल…
मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंड विजयी…
भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड संघाने जिंकला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला गेला, ज्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरी कसोटी पुण्यात (24 ते 28 आॅक्टोबर) आणि त्यानंतर तिसरी कसोटी मुंबईत (1 ते 5 नोव्हेंबर) होणार आहे. आता मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





