Shubman Gill : ‘मला माझ्या खेळाडूंवर अभिमान…!’, लीड्स कसोटीतील पराभवानंतर गिलचा संघावर विश्वास

मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर गिल थोडा निराश दिसला. पण त्याने संघावर विश्वास कायम असल्याचे व्यक्त केले. तो म्हणाला की, “ही कमाल कसोटी होती. आमच्याकडे संधी होत्या. पण त्या संधी आम्हाला साधता आल्या नाहीत. आम्ही झेल सोडले, फलंदाजीत तळाच्या क्रमांकावर धावा झाल्या नाहीत. पण मला माझ्या संघावर गर्व आहे. एकूण मिळून आम्ही चांगला प्रयत्न केला. आम्ही विचार करत होतो की ४३० च्या आसपास धावा करुन डाव घोषित करायचा. पण दुर्देवाने आम्ही धावा करु शकलो नाही. येणाऱ्या सामन्यात सुधारणा करु.”
भारतीय संघाचे मागील पाच वर्षातील हे सर्वात खराब प्रदर्शन-
भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी खूप खराब क्षेत्ररक्षण केले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने अनेक झेल सोडले. त्यामुळे भारतावर दबाव वाढला. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत भारतीय संघाचे मागच्या पाच वर्षातील हे सर्वात खराब प्रदर्शन आहे. २०१९ नंतर पहिल्यांदा असे झाले आहे, जेव्हा भारताने कुठल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त झेल सोडले आहेत.
हेही वाचा –IND vs ENG : भारतीय संघात मोठा बदल, दुसऱ्या कसोटीपूर्वी ‘हा’ वेगवान गोलंदाज मायदेशी परतणार
आम्ही चूकांमधून शिकू – शुबमन गिल
शुबमन गिल पुढे म्हणाला, “अशा प्रकारच्या विकेटवर सहज संधी मिळत नाही. पण आमच्याकडे युवा संघ आहे. आम्ही चूकांमधून शिकू आणि पुढे चांगलं प्रदर्शन करु. आम्ही पहिल्या सेशनमध्ये चांगली गोलंदाजी बॉलिंग केली होती. सहज धावा दिल्या नाहीत. पण चेंडू जुना झाल्यानंतर तो थांबवणे कठीण असते.”





