India Vs England 1st Test Stumps on the second day Highlights : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा आज दुसरा दिवस पार पडला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने पहिल्या डावात 246 धावा केल्या. भारताने गुरुवारी पहिला डाव एका विकेटवर 119 धावांवरून सुरू केला आणि दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत सात गड्यांच्या मोबदल्यात 421 धावा केल्या होत्या. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांची शतके हुकली. त्याचवेळी रवींद्र जडेजा शतकाच्या जवळ आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला..
भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सात विकेट गमावत 421 धावा केल्या आहेत. सध्या टीम इंडियाकडे इंग्लंडवर 175 धावांची आघाडी आहे. रवींद्र जडेजा 81 धावांवर नाबाद असून अक्षर पटेल 35 धावांवर नाबाद आहे.
Stumps on Day 2 in Hyderabad! 🏟️#TeamIndia move to 421/7, lead by 175 runs 🙌
See you tomorrow for Day 3 action 👋
Scorecard ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sul21QNVgh
— BCCI (@BCCI) January 26, 2024
दुसऱ्या दिवशी भारताने 1 बाद 119 धावांवरून खेळण्यास पुढे सुरुवात केली आणि आतापर्यंत 302 धावा जोडल्या आहेत. भारताला शुक्रवारी पहिला धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. दिवसाच्या पहिल्याच षटकात जो रूटने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने यशस्वीला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले.
यशस्वीचे शतक हुकले आणि तो 80 धावा करून बाद झाला. त्याचवेळी आजचा दुसरा धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. त्याला टॉम हार्टलीने बेन डकेटच्या हाती झेलबाद केले. त्याला 23 धावा करता आल्या. यानंतर केएल राहुलने श्रेयस अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मोठ्या फटकेबाजी प्रयत्नात श्रेयसची विकेट गेली. श्रेयस अय्यर 35 धावा करून बाद झाला. हार्टलेच्या हातून त्याला रेहान अहमदने झेलबाद केले.
त्याचवेळी राहुलने कसोटी कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक झळकावले. तो शतक झळकावेल असे वाटत होते, पण वैयक्तिक 86 धावांवर त्याला हार्टलीने रेहान अहमदकरवी झेलबाद केले. बाद होण्यापूर्वी राहुलने रवींद्र जडेजासोबत 65 धावांची भागीदारी केली. यानंतर जडेजा आणि केएस भरत यांनी जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनी 68 धावांची भागीदारी केली. जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 20 वे अर्धशतक झळकावले.
या सामन्यात जो रूटने दुसरे यश मिळवले. त्याने केएस भरतला एलबीडब्ल्यू आऊट केले. भरतला 41 धावा करता आल्या. भारताला 358 धावांवर सातवा धक्का बसला. रविचंद्रन अश्विन एक धाव काढून धावबाद झाला. अश्विन आणि जडेजा एका वेळी एकाच टोकाला होते. मात्र, जडेजा आधी क्रीजमध्ये आला त्यामुळे अश्विन धावबाद झाला. यानंतर जडेजाने अक्षरसोबत आठव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली.
15 runs off the final over of Day 2 courtesy @akshar2026 🔥🔥
The Jadeja-Axar partnership now 63*-runs strong 💪
Scorecard ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8AxB79zCyS
— BCCI (@BCCI) January 26, 2024
जडेजाने 155 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या असून अक्षरने 62 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून हार्टले आणि रूटने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. जॅक लीच आणि रेहान अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.