IND vs ENG : आकाश दीपच्या अर्धशतकानंतर गंभीरच्या चेहऱ्यावर फुललं हसू , गिल-जडेजाच्या इशाऱ्याने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

IND vs ENG Akash Deep Half Century : भारत आणि इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यातील भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज आकाश दीपने आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलं. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेल्या आकाशदीपने तिसऱ्या दिवशी दमदार फटकेबाजी करत कसोटी कारकिर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. यानंतर भारतीय संघाच्या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आकाश दीपच्या अर्धशतकानंतर भारतीय संघ खूश –
यावेळी ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या भारतीय संघाने राहून त्याच्या खेळीच कौतुक केलं. त्यावेळी गिल आणि जडेजा काही तरी इशारा करत होते. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या दरम्यान संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही आनंदाने हसताना दिसला. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने २ बाद ७५ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आकाशदीपने यशस्वी जैस्वालच्या साथीने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण केलं. पहिल्याच षटकात त्याने चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले.
A maiden international 5️⃣0️⃣ for Akash Deep 👏#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/O1wAt9ecyg
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 2, 2025
यानंतर २१ धावांवर असताना झॅक क्रॉलीने स्लिपमध्ये त्याचा सोपा झेल सोडला. या जीवनदानाचा फायदा घेत आकाशने ७० चेंडूंमध्ये आपलं पहिलंवहिलं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. आकाश दीपने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई करत कसोटी क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. भारताच्या दुसऱ्या डावातील ३८ व्या षटकात आकाशने गस अॅटकिन्सनचा चेंडू स्क्वेअर लेगमधून चौकारावर पाठवला आणि त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वाल-आकाशच्या भागीदारीने रचला इतिहास! ठरली २१व्या शतकातील विक्रमी शतकीय भागीदारी
आकाश दीपने अर्धशतक झळकावताच गिल-जडेजाने केला इशारा –
Jadeja and Gill wanted Akashdeep to remove his helmet and celebrate the fifty. 🤣 pic.twitter.com/ma3Wxp7L97
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 2, 2025
आकाश दीपने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आनंदाने बॅट वर करून आनंद साजरा केला. आकाश दीपने ४७ धावांवर असताना शानदार चौकार मारत आपले पहिले अर्धशतक साजरे केले. उत्साहात त्याने जल्लोष करत यशस्वी जैस्वालला मिठी मारली. संपूर्ण भारतीय संघ ड्रेसिंग रूममधून टाळ्या वाजवत त्याचे कौतुक करत होता. यावेळी गिल आणि जडेजा त्याला हेल्मेट काढण्याचा इशारा देत होते.
हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालचा शतकी धमाका! सचिनचा विक्रम मोडत गावस्कर-रोहितच्या यादीत झाला सामील
आकाश दीपच्या खेळीने गौतम गंभीरही आनंदी –
#INDvsENG #AkashDeep #तेजस्वी_यादव
Weldon Deep 💓💓💓 pic.twitter.com/PZ7VBzngkq— bhupendrameena 🇮🇳 (@bhupendra218) August 2, 2025
त्याचवेळी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही हसत होता. आकाश दीपने कठीण काळातही उत्तम फलंदाजी केली. त्याने संघासाठी तो किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले. त्याच्या खेळीमुळे संघात नवी ऊर्जा भरली. सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच्या फलंदाजीने खूप खूश होते. आकाश दीपचे हे पहिले अर्धशतक नेहमीच लक्षात राहील. त्याने ९४ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी साकारली.





