England Playing 11 For IND Vs ENG 2nd Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने आपले प्लेइंग-11 जाहीर केले आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत.
अनुभवी जेम्स अँडरसनचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर जखमी जॅक लीच आणि मार्क वुड यांना संघातून वगळण्यात आले आहे. शोएब बशीरचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
We have named our XI for the second Test in Vizag! 🏏
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) February 1, 2024
इंग्लंड संघात दोन्ही बदल गोलंदाजीत झाले आहेत. फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पहिल्या सामन्यातही मार्क वुड हा एकमेव वेगवान गोलंदाज संघात होता. त्याला एकही विकेट घेता आली नाही आणि त्याच्या जागी अनुभवी जेम्स अँडरसनला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. या सामन्यात अँडरसन आपल्या 700 कसोटी बळीही पूर्ण करू शकतो.
700 विकेट पूर्ण करण्याची संधी..
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 183 कसोटी सामन्यांच्या 341 डावांमध्ये गोलंदाजी करताना अँडरसनने 26.42 च्या सरासरीने 690 विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याला 700 विकेट्स घेण्यासाठी फक्त 10 विकेट्सची गरज आहे. अँडरसन 700 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरू शकतो. आतापर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाला हा आकडा स्पर्श करता आलेला नाही.
IND vs ENG Test Series : आणखी 10 षटकार, अन् रोहित शर्मा बनवणार जगातील सर्वात मोठा विक्रम…
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
जैक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.