IND vs ENG : डकेट-कॉलीच्या जोरावर इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! ऋषभ पंतची दोन शतकं ठरली व्यर्थ

IND vs ENG England beat India by 5 wickets : बेन डकेटचे शतक आणि क्रॉली-रूटच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारतावर ५ विकेट्सनी ऐतिहासिक विजय नोंदवला. इंग्लंडचा लीड्सवर धावांचा पाठलाग करतानाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात आघाडी घेऊनही भारतीय संघ हा सामना जिंकू शकला नाही. भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ठरले. इंग्लंडकडून रूट (५३) आणि स्मिथ (४४) नाबाद परतले. भारताकडून कृष्णा आणि ठाकूरने प्रत्येकी दोन, तर रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.
भारताचा पराभव कसा झाला?
लीड्स कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला ३७१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५० धावांची गरज होती. इंग्लंडच्या सलामीवीरांनी या विजयाचा अध्याय लिहिला. सलामीला आलेल्या बेन डकेटने शानदार शतक आणि झॅक क्रॉली अर्धशतक ठोकले. या दोघांनी पहिल्या विकेट्साठी १८८ धावांची भागीदारी करून भारतीय संघावर दडपण आणले.
A staggering run chase from England in Leeds to go 1-0 up against India 🙌#WTC27 | #ENGvIND 📝: https://t.co/FXxW1Hk8VO pic.twitter.com/7Zf3iUY9lr
— ICC (@ICC) June 24, 2025
क्रॉली बाद झाल्यानंतर ऑली पोप आणि हॅरी ब्रूक यांची विकेट सलग दोन चेंडूंवर पडले. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट यांनी अर्धशतकीय भागीदारी करून भारताला सामन्यातून जवळपास बाहेर फेकले. बेन डकेटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावत १४९ धावांची शानदार खेळी केली. जो रूटनेही अर्धशतकी खेळी केली, तर बेन स्टोक्सने महत्त्वपूर्ण ३३ धावा जोडल्या.
हेही वाचा – IND vs ENG : डकेट-क्रॉलीने भारताविरुद्ध रचला इतिहास! मोडला ७२ वर्षांचा सर्वात मोठा विक्रम
दुसऱ्या डावात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ठरले अपयशी –
लीड्स कसोटीत टीम इंडियाने शानदार फलंदाजी केली पण दुसऱ्या डावात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूपच खराब होते. दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, बुमराह आणि सिराज या दोन्ही स्ट्राईक गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा यांनी निश्चितच २-२ विकेट घेतल्या पण ते खूप महागडे ठरले. गोलंदाज काय करू शकत होते, त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. या सामन्यात टीम इंडियाने एकूण ६ झेल सोडले. यशस्वी जैस्वालने एकट्याने सामन्यात चार झेल सोडले.
हेही वाचा – IND vs ENG : बेन डकेटने रचला इतिहास! लीड्स कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा इंग्लंडचा ठरला पहिलाच खेळाडू
भारतासाठी ठरला मोठा पराभव:
- हा पराभव टीम इंडियासाठी धक्कादायक आहे आणि त्याचे कारण हे विक्रम आहेत
- टीम इंडिया हा पहिला संघ आहे, ज्याच्या फलंदाजांनी पाच शतके झळकावली पण तरीही कसोटी सामना गमावला.
- भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने आपले दोन सर्वात मोठे विजय नोंदवले आहेत.
- गेल्या २५ वर्षात भारतीय कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी गमावणाऱ्यांच्या यादीत गिलचे नाव नोंदले गेले आहे. यामध्ये विराट, केएल राहुल, बुमराह यांचाही समावेश आहे.





