IND vs ENG 5th Test : यशस्वीने 57 धावांच्या खेळीसह मोडीत काढले कोहलीचे 3 मोठे विक्रम…

IND vs ENG 5th Test , Yashasvi Jaiswal & Virat Kohli : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले आणि 58 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. बशीरने यशस्वीला यष्टिरक्षक फॉक्सकडून यष्टिचित केले. आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 9 डावात आतापर्यंत 712 धावा केल्या आहेत.
1. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा….
यशस्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने विराट कोहलीचा सात वर्षे जुना विक्रम मोडला. विराटने 2016-17 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत आठ डावात 655 धावा केल्या होत्या. सध्या यशस्वीच्या नावे 712 धावांची नोंद झाली आहे.
2. विराटची सर्वोत्तम कामगिरी टाकली मागे…
तसेच जैस्वाल हा भारतासाठी कसोटी मालिकेत 700 किंवा त्याहून अधिक धावा करणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा फलंदाज ठरला.भारताकडून याआधी केवळ सुनील गावसकर यांनी कसोटीत दोनदा अशी कामगिरी केली होती. या कसोटी मालिकेत 712 धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वालने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि कोहलीला चौथ्या स्थानावर ढकलले आहे. विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत 692 धावा केल्या होत्या, ही कोहलीची सर्वोत्तम कामगिरी आहे, पण या कसोटी मालिकेत 712 धावा करून यशस्वीने त्याला मागे सोडले.
भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे ज्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 774 धावा केल्या होत्या. आता यशस्वी जैस्वालने धरमशाला कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 63 धावा केल्या तर भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर येईल.
भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा…
1. सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (774 धावा)
2. सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (732 धावा)
3. यशस्वी जैस्वाल वि. इंग्लंड (712 धावा)
4. विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया (692 धावा)
5. विराट कोहली विरुद्ध इंग्लंड ( 655 धावा)
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ind-vs-eng-5th-test-kuldeep-yadavs-once-in-a-100-years-performance-rips-apart-england-in-5th-test/
3. कोहलीपेक्षा जास्त षटकार…
35 वर्षीय विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने एकूण 26 षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे, यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. आजच्या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करतानं त्यानं 3 षटकार लगावले. ज्यामुळे कसोटीत त्याची एकूण षटकाराची संख्या 29 पर्यंत पोहचली आहे. त्यानं षटकार मारण्याच्या बाबतीतही कोहलीला मागे टाकलं आहे. म्हणजे कोहली 113 कसोटीत जे करू शकला नाही, ते जैस्वालनं 9व्या कसोटीत केलं आहे.





