IND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीत पाऊस ठरणार खलनायक? हवामान खात्याचा अहवाल आला समोर…

IND vs ENG 5th Test, Dharamsala Weather Forecast : भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (दि.7) पाचवी कसोटी खेळली जाणार आहे. धर्मशाला येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र या कसोटीपूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, धर्मशाला मध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. याशिवाय कसोटीदरम्यान पावसाची शक्यता आहे. म्हणजेच भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीत पाऊस खलनायक ठरू शकतो.
हवामान खात्यानुसार, धर्मशाला मध्ये कमाल तापमान 1 अंशाच्या आसपास राहील. तसेच तापमान -4 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. या कडाक्याच्या थंडीत खेळणे दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी मोठे आव्हान असेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून कसोटी महत्त्वाची…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली आहे. पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेच्या दृष्टिकोनातून पाचवी कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र यानंतर टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले. पहिल्या कसोटीनंतर भारताने सलग तीनही सामने जिंकले. अशाप्रकारे भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला धरमशाला कसोटी जिंकून मालिका 4-1 ने जिंकायची आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची शर्यत झाली ए रंजक…
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघ 64.58 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानंतर न्यूझीलंड 60 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ind-vs-eng-5th-test-3-colossal-virat-kohli-records-yashasvi-jaiswal-can-break-in-5th-test/
ऑस्ट्रेलियाचे 50.09 टक्के गुण आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडची स्थिती खराब होत चालली आहे. इंग्लंड 19.44 टक्के गुणांसह आठव्या स्थानावर आहे. फक्त श्रीलंका संघ इंग्लंडच्या खाली आहे. भारताने अखेरची कसोटी जिंकल्यास आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील स्थिती आणखी मजबूत होईल तर इंग्लंड हरल्यास ते तळाच्या स्थानावर जातील.





