\n

तत्पूर्वी, गुरुवारच्या 1 बाद 135 वरुन आज पुढे खेळ सुरु झाल्यावर कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलच्या साथीत आक्रमक सुरुवात केली. या जोडीने दीडशतकी भागीदारी करताना संघाला सामन्यावर पकड घेण्याची संधी मिळवून दिली. नाबाद अर्धशतकवीर रोहितने कलामीची फटकेबाजी केली. त्याने अर्धशतकाचे रुपांतर शतकात करताना गिलच्या साथीने धावफलक हलता ठेवला. गिलने अर्धशतकी पल्ला पार केल्यावर मनमुराद टोलेबाजी केली. त्यानेही रोहितच्या पाउलावर पाउल ठेवत शतक साकार केले. मात्र, हे दोघेही शतक पूर्ण झाल्यावर फारकाळ टीकू शकले नाहीत.

\n

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ind-vs-eng-has-james-anderson-become-the-enemy-of-shubman-gill-have-been-out-6-times-so-far/

\n

रोहित 162 चेंडुत 13 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 103 धावा करुन परतला.गिलने 110 धावांची खेळी करताना 150 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. हे दोघे परतल्यावर नवोदित सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पडीक्कल यांनी पुन्हा डाव सावरला. सुरुवातीला अडखळ्यांनंतर सर्फराज व पडीक्कलने चांगला जम बसवला. या जोडीने आधी संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. तर याच खेळीत संघाच्या साडेतीनशे धावाही फलकावर लावल्या. या दोघांनीही आपापली अर्धशतक पुर्ण केली. सर्फराज अनावश्‍यक फटका मारून 56 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 60 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार मारला. पडीक्कलही जम बसल्यावर 65 धावांवर परतला. त्याने 103 चेंडूत 10 चौकार व 1 षटकार फटकावला. मात्र, बाद होण्यापूर्वी संघाच्या चारशे धावा त्याने फळकावर लावल्या.

\n

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ind-vs-eng-5th-test-yashasvi-jaiswal-broke-sachin-tendulkars-historical-record-became-number-1-in-this-special-case/

\n

नवोदित परंतू भरवशाचा बनलेला यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल अवघ्या 15 धावा काढून बाद झाला. एका बाजूने रवींद्र जडेजा तळ ठोकून होता. त्याला साथ देण्यासाठी आपली 100 वी कसोटी खेळत असलेला रवीचंद्रन अश्‍विन फलंदाजीला आला. मात्र, त्याचवेळी 15 धावांवर खेळत असलेला जडेजा बाद झाला. पाठोपाठ अश्‍विनलाही खाते उघडता आले नाही. तळात कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनीही सावध फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. या जोडीने संघाच्या साडेचारशे धावा फलकावर लावल्या. या जोडीने 9 व्या गड्यासाठी 45 धावांची अखंडीत भागीदारी केली व इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणले.

\n

पहिल्या दिवशी काय झालं….

\n

दरम्यान, पहिल्या दिवशी कुलदीप यादव व रवीचंद्रन अश्‍विन यांची भेदक गोलंदाजी व यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहितची नाबाद अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर यजमान टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 1 गडी गमावून 135 धावापर्यंत मजल मारली होती. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या . यानुसार भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 83 धावांनी मागे होता. कर्णधार रोहित शर्मा 52 (83 चेंडू,6 चौकार, 2 षटकार) धावांवर नाबाद असून शुभमन गिल 26 धावांवर (39 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार) नाबाद परतले होते. दोघांमध्ये 31 धावांची भागीदारी झाली.

\n

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/india-135-1-in-first-innings-83-runs-behind-england-yashasvi-rohit-scored-runs-after-spinners-wreaked-havoc/

\n

भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. 58 चेंडूत 57 धावा करून तो बाद झाला. शोएब बशीरने त्याला यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. यशस्वीने 57 धावांच्या खेळीत 5 चौकार व 3 षटकार लगावले. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. यशस्वीचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे अर्धशतक होते. त्याचवेळी, रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 18 वे अर्धशतक ठरले.

\n

त्याआधी, इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी खेळत चार विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs ENG 5th Test (Day 2-Stumps) : टीम इंडियाची मोठ्या आघाडीसह धर्मशाला कसोटीवर मजबूत पकड…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/Team-india-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-5th-test-day-2-stumps-second-days-play-ends-india-473-8-in-first-innings-lead-by-255-runs-so-far#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/Team-india-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-5th-test-day-2-stumps-second-days-play-ends-india-473-8-in-first-innings-lead-by-255-runs-so-far#webpage","name":"IND vs ENG 5th Test (Day 2-Stumps) : टीम इंडियाची मोठ्या आघाडीसह धर्मशाला कसोटीवर मजबूत पकड…","url":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-5th-test-day-2-stumps-second-days-play-ends-india-473-8-in-first-innings-lead-by-255-runs-so-far","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-5th-test-day-2-stumps-second-days-play-ends-india-473-8-in-first-innings-lead-by-255-runs-so-far#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/Team-india-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-5th-test-day-2-stumps-second-days-play-ends-india-473-8-in-first-innings-lead-by-255-runs-so-far#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-5th-test-day-2-stumps-second-days-play-ends-india-473-8-in-first-innings-lead-by-255-runs-so-far","name":"IND vs ENG 5th Test (Day 2-Stumps) : टीम इंडियाची मोठ्या आघाडीसह धर्मशाला कसोटीवर मजबूत पकड…"}}]}}}

IND vs ENG 5th Test (Day 2-Stumps) : टीम इंडियाची मोठ्या आघाडीसह धर्मशाला कसोटीवर मजबूत पकड…