IND vs ENG 5th Test : किंग कोहलीचे 3 मोठे रेकॉर्ड धोक्यात! धर्मशाला कसोटीत जैस्वालला इतिहास रचण्याची विराट संधी…

Virat Kohli 3 Colossal Records Yashasvi Jaiswal Can Break In 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 07 मार्चपासून धर्मशाळा येथे खेळवली जाणार आहे. या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जैस्वालवर लोकांच्या नजरा असतील आणि जयस्वाल विराट कोहलीच्या तीन मोठ्या विक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. या मालिकेत आतापर्यंत दोन द्विशतके झळकावणारा जैस्वाल धर्मशालामध्ये कोहलीचा विक्रम मोडून मोठी कामगिरी करू शकतो.
1. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा….
जैस्वालने आतापर्यंत मालिकेतील चार सामन्यांत 93.57 च्या सरासरीने 655 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या. आता दोन्ही ( Virat Kohli And Yashasvi Jaiswal ) खेळाडू बरोबरीवर आहेत. अशा स्थितीत जैस्वाल कोहलीचा विक्रम मोडेल आणि धर्मशाला कसोटीत अवघी एक धाव काढून त्याच्या पुढे जाईल. म्हणजेच सामन्यात खाते उघडताच तो कोहलीचा विक्रम मोडीत काढेल.
2. विराटची सर्वोत्तम कामगिरी टाकेल मागे…
विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत 692 धावा केल्या होत्या, ही कोहलीची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता जयस्वाल कोहलीचा सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडण्यापासून केवळ 38 धावा दूर आहे. धरमशाला कसोटीत 38 धावा करताच जैस्वाल कोहलीचा हा विक्रम मोडेल.
3. कोहलीपेक्षा जास्त षटकार मारणार हे निश्चित!
35 वर्षीय विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने एकूण 26 षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे, यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने कोहलीइतकेच षटकार ठोकले आहेत. आता त्याला कोहलीला मागे सोडण्यासाठी फक्त 1 षटकार हवा आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/team-india-young-batsman-yashasvi-jaiswal-who-once-sold-panipuri-has-such-a-struggling-journey/
धर्मशाला कसोटीत एक षटकार मारताच तो कोहलीपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज बनेल. म्हणजेच कोहली 113 कसोटीत जे करू शकला नाही, ते जैस्वाल 9व्या कसोटीत करू शकतो. आता जैस्वाल ( Virat Kohli And Yashasvi Jaiswal ) या तीनपैकी कोहलीचे कोणते विक्रम मोडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





