INDIA vs ENGLAND 4th Test, England Playing 11 : रांची येथे खेळल्या जाणाऱ्या (शुक्रवार, 23 फेब्रुवारी) चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ऑफस्पिनर शोएब बशीरचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनलाही संधी मिळाली आहे. लेगस्पिनर रेहान अहमद आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांना संघातून वगळण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना उद्या (शुक्रवार) रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या कसोटीसाठी शोएब बशीर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. तो आपल्या घरच्या फॉर्मची पुनरावृत्ती करून इंग्लंडला मालिकेत कायम ठेवू शकेल का? याचं उत्तर रांचीच्या मैदानावर मिळेल.
We have named our XI for the fourth Test in Ranchi! 🏏 👇
🇮🇳 #INDvENG 🏴 #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) February 22, 2024
खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या जॉनी बेअरस्टोला इंग्लंडने आणखी एक संधी दिली आहे. रांची कसोटीतही तो प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. रांची कसोटीत सीनियर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन देखील प्लेइंग इलेव्हनचा एक भाग आहे. लेगस्पिनर रेहान अहमदला संघातून बाहेर करण्यात आले आहे.
जॅक क्रॉली आणि बेन डकेट चौथ्या कसोटीतही डावाची सुरुवात करतील. उपकर्णधार ऑली पोप तिसऱ्या क्रमांकावर तर माजी कर्णधार जो रूट चौथ्या क्रमांकावर खेळेल. यानंतर पाचव्या क्रमांकावर खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या जॉनी बेअरस्टोला आणखी एक संधी मिळाली आहे. कर्णधार बेन स्टोक्स सहाव्या क्रमांकावर आणि यष्टीरक्षक बेन फॉक्स सातव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.
गोलंदाजीत टॉम हार्टले आणि शोएब बशीर असे दोन फिरकीपटू आहेत. अशा परिस्थितीत रूट तिसऱ्या फिरकी गोलंदाजाची भूमिका साकारताना दिसणार आहे. इंग्लंडचा संघ दोन वेगवान गोलंदाजांसह रांचीत दाखल होणार आहे. जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन यांना शेवटच्या अकरामध्ये स्थान मिळाले आहे. या मालिकेतील रॉबिन्सनचा हा पहिलाच सामना असेल.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन – जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स, टॉम हार्टले, शोएब बशीर, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.