IND vs ENG : सामन्यापूर्वी खेळपट्टी पाहण्यासाठी गेलेल्या बुमराहला रोखलं, नेमकं काय घडलं? VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG 3rd Test Jasprit Bumrah Video Viral : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हन बुमराह-आर्चरच्या रुपाने प्रत्येकी एकच बदल केला आहे. त्यामुळे भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. दरम्यान नाणेफेक होण्यापूर्वी बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो खेळपट्टी तपासण्यासाठी जातो, पण त्याला तसे करण्यापासून रोखले जाते. त्यानंतर त्याने मजेत अधिकाऱ्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.
नक्की काय घडलं?
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सामना सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराह इतर खेळाडूंसोबत सराव करत होता. यावेळी तो नाणेफेकीपूर्वी शेवटच्या वेळी खेळपट्टी पाहण्यासाठी गेला. बुमराहने खेळपट्टीभोवती लावलेली दोरी ओलांडली आणि खेळपट्टीजवळ पोहोचला. त्याने खेळपट्टीला स्पर्श केला आणि थोडा वेळ थांबला. यावेळी मैदानावरील अधिकाऱ्याने त्याला खेळपट्टीपासून थोडे दूर जाण्यास सांगितले. यावेळी बुमराह अधिकाऱ्याला चिथावताना दिसला आणि त्याने मजेत विचारले, “मी किती दूर उभा आहे?” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
— Nihari Korma (@NihariVsKorma) July 10, 2025
बुमराह विकेट्स घेण्यासाठी करतोय संघर्ष –
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लीड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. परंतु, त्यानंतर त्याला विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात बुमराहला एकही विकेट मिळाली नाही आणि लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रातही त्याला कोणतीही विकेट मिळवता आली नाही.
हेही वाचा – IND vs ENG : नितीश रेड्डीचा कहर; अवघ्या चार चेंडूंत केली इंग्लंडच्या सलामीवीरांची शिकार! VIDEO व्हायरल
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडसाठी सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेट्ससाठी ४३ धावांची भागीदारी केली. नितीश कुमार रेड्डीने आपल्या पहिल्याच षटकात बेन डकेटला (२३) बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर रेड्डीने झॅक क्रॉलीलाही (१८) पंतच्या हातून बाद करून एकाच षटकात भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्यानंतर आता वृत्तलिहिपर्यंत इंग्लंड संघाने २६ षटकानंतर २ बाद ८७ धावा केल्या आहेत. ऑली पोप (१६) आणि जो रुट (२४) खेळत आहेत.





