IND vs ENG 3rd Test 1st day Live Score : भारताला चौथा धक्का, कर्णधार रोहित 131 धावा करून परतला माघारी….

IND vs ENG 3rd Test (Day 1) Live Cricket Score : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. हा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे.
IND vs ENG Live : भारताला चौथा झटका…
भारताला 237 धावांवर चौथा धक्का बसला आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा डाव 131 धावांवर संपुष्टात आला. त्याने ही खेळी 196 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने खेळली. त्याने रवींद्र जडेजासोबत 204 धावांची भागीदारी केली.
3RD Test. WICKET! 63.3: Rohit Sharma 131(196) ct Ben Stokes b Mark Wood, India 237/4 https://t.co/FM0hVG5X8M #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 15, 2024
भारताची धावसंख्या सध्या 63.4 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 238 धावा आहे. रवींद्र जडेजा 85 धावा करून क्रीजवर आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सरफराज खान आला आहे.
IND vs ENG Live : रोहितचे शतक…
याआधी रोहित शर्माने 157 चेंडूत शतक झळकावले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 11वे शतक होते. रोहितने जुलै 2023 नंतर कसोटीतील पहिले शतक झळकावले आहे. त्याचे यापूर्वीचे शतक जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाले होते. त्यावेळी विंडसर पार्कवर त्याने 103 धावांची खेळी खेळली होती.
IND vs ENG Live : 33 धावांंवरच भारताला तीन धक्के..
यशस्वी जैस्वाल (10), शुभमन गिल (0) आणि रजत पाटीदार (5) यांच्या रूपाने टीम इंडियाला तीन धक्के बसले आहेत. भारताला 33 धावांवर तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांच्यानंतर रजत पाटीदारही पॅव्हेलियनमध्ये परतला. वुडने यशस्वी आणि शुभमनला बाद केले, तर टॉम हार्टलीने रजतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यशस्वी 10 धावा करून, शुभमन खाते न उघडता आणि रजत पाच धावा करून बाद झाले. भारताची ही फलंदाजी लाईन अननुभवी आहे.
Team India : पुजाराची कारकीर्द जवळपास संपूष्टात, ‘ती’ शक्यताही ठरली फोल….
IND vs ENG Live : दोन्ही संघांचे Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार ), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जैक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जेम्स एंडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.
IND vs ENG Live: नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय…
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघात चार बदल करण्यात आल्याचे कर्णधाराने सांगितले. सरफराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर अक्षर आणि मुकेश कुमार यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. जडेजा दुखापतीमुळे शेवटच्या कसोटीत खेळला नव्हता. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा 100 वा कसोटी सामना आहे.





